आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Amravati
  • Heavy Rain Expected In Amravati District Widespread Rain Forecast In District Till Tuesday; Flooding Of Rivers And Canals Many Villages Were Inundated With Water

अमरावती जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी:मंगळवारपर्यंत जिल्ह्यात सार्वत्रिक पावसाचा अंदाज; नदी-नाल्याना पूर- अनेक गावात पाणी तुंबले

अमरावती21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरासह जिल्ह्यात रविवारी (दि. 11) मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आणखी दोन दिवस जिल्ह्यात सार्वत्रिक पाऊस राहणार असल्याची माहिती श्री शिवजी कृषी महाविद्यालयाचे प्रा. अनिल बंड यांनी दिली. भर पावसातच काही गणेश मंडळांची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली.

रविवारी सकाळीपासूनच शहरात पावसाने उसंत घेत दिवसभर हजेरी लावली. याशिवाय अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, चांदूर बाजार, चांदूर रेल्वे, परतवाडा, दर्यापूर, वरुड, मोर्शीसह जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली. एकप पिक काएणीचया तोंडावर आलेला पाऊस शेतकऱ्यांच्या तोंडचा घास तर पळवणार नाही, याची चिंता शेतकऱ्यांना भेडसावत आहे. दर्यापूर तालुक्यातील कोणतीही जीवीतहानी झाली नसल्याची माहिती तहसीलदार डॉ. योगेश देशमुख यांनी दिली.

पुढील दोन दिवस सार्वत्रित पाऊस

आंध्र-ओरीसा किनारपट्टीवर निर्माण झालेल्या कमी दाबाचे क्षेत्र आता वादळाच्या स्वरुपात ओरीसा, छत्तीसगडजवळ आहे. हे वादळ उत्तर-वायव्य दिशेने पुढे सरकत आहे. मान्सुनची ट्रफरेषा दक्षिणेकडे झुकलेली आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस जिल्ह्यात गडगडाटासह सार्वत्रिक पावसाची शक्यता असल्याची माहिती प्रा. अनिल बंड यांनी दिली.

धामणगाव तालुक्यावर पावसाची वक्रदृष्टी कायम

तालुक्यात रविवारी (दि. 11) दुपारपासून सर्वदूर जोरदार पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली. अनेक गावात पावसाचे पाणी शिरले. अनेक नदी-नाल्यांना पूर आला होता. पावसाने अनेक घरांची पडझड झाली असून गावे बाधित झाली, तर शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले. दुपारी १ वाजतापासून तालुक्यात धुवाधार पावसाला सुरूवात झाली. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे जगावे की मरावे असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

रविवारी सकाळपासूनच आभाळ दाटून आले होते. दरम्यान एक वाजताच्या सुमारास ढगांचा गडगडाट व विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरूवात झाली. लहान मोठ्या नदी-नाल्यांना पूर आला, तर ग्रामीण भागात नाल्या तुंबल्याने त्या ओव्हरफ्लो होवून अनेक गावांमधून पावसाचे पाणी रस्त्यावर आले होते. त्यामुळे काही गावांचे रस्ते बंद झाल्याने संपर्क तुटला होता. रस्तेही पाण्यात गेल्याने काही काळ वाहतूक ठप्प होती.

धरणाचे दरवाजे उघडले

निम्नवर्धा प्रकल्पाच्या वरुड बगाजी धरणाच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ झाली असून धरणाचे सर्वच दरवाजे 30 सेंमीने उघडून त्याचा विसर्ग वर्धा नदीपात्रात करण्यात येत आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आल्याची माहिती निम्न्न वर्धा प्रकल्पाचे उपविभागीय अभियंंता पवन पांढरे यांनी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...