आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नदी-नाले तुडुंब:नांदगाव खंडेश्वर तालुक्यात अतिवृष्टी; शेकडो हेक्टरवरील पिके पाण्याखाली

नांदगाव खंडेश्वर13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रविवार सकाळपासून सुरू झालेल्या संततधार पावसामुळे तालुक्यातील नदी नाले मोठ्या प्रमाणात भरभरून वाहत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काही गावांमध्ये घरांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

रविवारपासून सुरू असलेल्या पावसामुळे तालुक्यातील बेंबळा नदीला पूर आला असून नदीकाठच्या शेतात पुराचे पाणी शिरले. तालुक्यातील काही नदी नाले भरभरून वाहत आहे त्यातच बेंबळा नदीच्या पुराचे पाणी धामक गावात शिरले असून या गावाला चोहोकडून पाण्याचा वेढा आहे. तेव्हा अशीच परिस्थिती राहिल्यास या गावाचा संपर्क तुटू शकतो, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. जवरा मोळवण येथेही नदीच्या पुलावरून पुराचे पाणी वाहात असल्याने सायंकाळी ६ वाजता पासून जावरा मोडवन, पळसमंडळ, खंडाळा, धर्मापुर, मुंडवाडा या गावांचा तालुक्यापासून संपर्क तुटला आहे. तर सावनेर येथे ढगफुटीसदृश्य पावसामु‌ळे शेतात पाणी साचले आहे. तालुक्यातील काही गावांमधील भिंती व घरे पडली आहेत. दरम्यान, प्रशासनाने लक्ष देण्याच्या सूचना आजी-मााजी लोकप्रतिनिधींनी दिल्या आहेत. पावसामुळे शेकडो हेक्टरवरील सोयाबीन, तूर, कपाशी ही पिके पाण्याखाली आल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. परिणामी प्रशासनाकडून तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना व नागरिकांना आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी तालुक्यात होत आहे.

देव तारी त्याला कोण मारी - रात्री अचानक माझ्या घराची भिंत कोसळली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात घराचे नुकसान झाले. रात्री २.२० ला माझ्या आईने मला उठवून सांगितले की भिंतीची माती पडत आहे. तर मी उठलो आणि बाबाला उठवून घराबाहेर नेले. तेथून ५ मिनिटातच घराची भिंत कोसळून छत खाली पडले. ५ मिनटात जर घराबाहेर आलो नसतो तर आज विचित्र स्थिती निर्माण झाली असती, अशी माहिती धमक येथील विठ्ठलदास लष्करे यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.

बातम्या आणखी आहेत...