आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या विधवा पत्नींना नाम फाउंडेशनतर्फे नुकताच मदतीचा हात देण्यात आला. या आर्थिक मदतीच्या धनादेशाचे वितरण संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील संत गाडगे बाबा अध्यासन केंद्रात करण्यात आले. या प्रसंगी कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांनी २८ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा पत्नींना धनादेश वितरित केला. या प्रसंगी समन्वयक वसंत जोशी, श्री गजानन काळे, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, अध्यासन केंद्रप्रमुख डॉ. दिलीप काळे, जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या प्रसंगी मार्गदर्शन करताना कुलसचिव डॉ. तुषार देशमुख म्हणाले, नाम फाउंडेशनचे फार मोठे कार्य असून, शेतकऱ्यांच्या विधवा महिलांना दिल्या जात असलेल्या मदतीने त्या स्वत: पायावर उभ्या राहतील व आपल्या मुलाबाळांना शिकवतील, पाठींबा देतील याशिवाय त्यांनी छोटे उद्योग सुरू करावे, असे आवाहन केले. डॉ. दिलीप काळे म्हणाले, पुरुषांच्या आत्महत्या झाल्यात, पण महिला हिंमतीने पुढे आल्यात. महिलांना हिंमत मिळावी, म्हणून हा कार्यक्रम विद्यापीठामध्ये आयोजित केल्याचे त्यांनी सांगितले.
श्री वसंत जोशी यांनी सांगीतले, नाम फाऊंडेशनच्या निधीतून शेतकरी आत्महत्या विधवांना मदत दिल्या जाते. ती मदत शिलाई मशीन, शेळ्यांचे वाटप आदी प्रकारे केली जाते. आत्महत्या झालेल्या शेतकऱ्यांच्या परिवाराला मदत व्हावी, असा या कार्यक्रमाचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगीतले. सुरूवातीला गाडगे बाबांच्या प्रतिमेला वंदन करण्यात आले. या वेळी अध्यासनातर्फे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांना गाडगे बाबांचा दशसूत्री संदेश देवून सत्कार केला. सूत्रसंचालन जोत्सना मेहकरे, तर आभार गजानन काळे यांनी मानले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.