आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआमदार रवी राणा यांच्याविरुध्द मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जामीनपात्र वॉरंट काढला आहे. हा वॉरंट आमदार राणा यांना देण्यासाठी राजापेठ ठाण्याचे पोलिस शनिवारी (दि. १८) मुंबईत पोहचले. मात्र शनिवारी रात्रीपर्यंत आमदार राणा हे पोलिसांना भेटले नसल्यामुळे वॉरंट त्यांना मिळाले नव्हते.
मनपा आयुक्त डॉ. प्रविण आष्टीकर यांच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी आमदार रवी राणा यांच्यासह अकरा जणांविरुद्ध जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न करणे व इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, आमदार राणा यांना त्या प्रकरणात जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन दिला आहे. हाच अटकपूर्व जामीन रद्द करण्यासाठी शहर पोलिसांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे.
भाजपला मतदान करू नये म्हणून अटकेचा प्रयत्न : राणा
मी भाजपला मतदान करु नये, म्हणून महाविकास आघाडीने अमरावती पोलिसांना माझ्या मुंबईतील घरी मला अटक करण्यासाठी पाठवले आहे. मात्र मी घरी नसल्यामुळे पोलिस मला अटक करु शकले नाहीत, असा आरोप आमदार राणा यांनी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओव्दारे केला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.