आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकिती ही उन्हाळा असला तरी मनुष्य स्वत:साठी पाण्याची सोय करून घेतो. त्याचप्रमाणे प्राणीही मिळेल तिथे पाणी पितात. परंतु पक्ष्यांना पाणवठे कोरडे पडल्यानंतर पाण्यासाठी इतरत्र भटकंती करावी लागते. त्यासाठी नागरिकांनी मानवी दृष्टिकोनातून पक्ष्यांनाही पाणी आणि निवाऱ्याचा आसरा देण्यासाठी जल पात्र व घरटी सावलीच्या ठिकाणी बसवण्यास पुढाकार घ्यावा, यासाठी आज जागतिक चिमणी दिवसानिमित्त वसा संस्थेद्वारे तृष्णा तृप्ती अभियान राबवण्यात येत आहे. नागरिकांनी पक्ष्यांसाठी जल पात्रांची व्यवस्था करावी, असे आवाहनही वसा संस्थेचे निखिल फुटाणे यांनी केले आहे.
पाळीव प्राण्यांसह पक्ष्यांना वाढत्या उष्णतेच्या झळा पोहोचत आहेत. अशावेळी उष्माघाताने त्यांचा बळी जाण्याची भीती असते. मुक्या जीवाच्या मदतीसाठी प्रत्येकाने वाटा उचलण्याची आज खरी गरज आहे. यंदा होळीपूर्वीच उन्हाचा पारा वाढला आहे. हा पारा ४१ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. त्यामुळे नागरिकांना चांगलाच घाम फुटत आहे. पाळीव प्राणी, पक्षी, वा अन्य वन चर प्राण्यांवर हवामानातील बदलाचा परिणाम होतोे. प्राण्यांच्या शरीराचे तापमान मानवी तापमानापेक्षा अधिक असल्याने कडक उन्हाळ्यात त्यांना अनेक शारीरिक व्याधी उद्भवतात. पशुपक्ष्यांना ही उन्हाचा फटका बसत आहे. उष्णतेमुळे प्राण्यांना डिहायड्रेशन होते. शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे ते आजारी पडतात. विविध उन्हाळी सांसर्गिक आजार जडतात. अशा प्राण्यांवर वेळीच उपचार केले जातात. मात्र, प्राण्यांना उन्हाच्या त्रासापासून वाचवणे अवघड झाले आहे.
त्यामुळे नागरिकांनी उष्मघाताने खाली पडलेल्या पक्ष्याला चांगल्या कापडाच्या साह्याने उचलून सावलीच्या ठिकाणी ठेवावे. थोड्या वेळाने शांत झाल्यावर किंवा हालचाल करायला लागल्यावर चिमूट भर साखरमिश्रित पाणी प्यायला द्यावे, ते पाणी स्वतःहून पित असेल तर ठीक आहे. अन्यथा जबरदस्ती ने पाणी पाजू नये. पक्ष्याला रिकव्हर व्हायला वेळ द्यावा. तसेच प्लास्टिक आणि इतर धातूच्या भांड्यात पाणी न ठेवता मातीच्या भांड्यात पाणी ठेवावे. घरा जवळ जास्त पक्षी यावे असे वाटत असेल तर स्थानिक प्रजातीची फुल झाडे आणि फळ झाडे लावावे. अशी माहिती वसाचे गणेश अकर्ते यांनी दिली.
वन विभागाचा १९२६ हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध
उन्हाचा फटका बसलेला पक्षी एक तासानंतरही उडत नसेल तर लगेच पशु चिकित्सा लय अमरावती येथे उपचारांकरिता घेऊन जावे. किंवा १९२६ या वन विभागाच्या टोल फ्री नंबर वर संपर्क करावा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.