आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराश्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ म्हणजे खात्रीशीर यशाचे दुसरं नाव अशी ख्याती आहे. यात आता नेमबाजी क्रीडा विभागाच्या ‘शुटींग सेफ्टी काेर्स’ची भर पडली आहे. नोंदणीकृत महाराष्ट्र रायफल असोसिएशन मुंबई द्वारे प्रमाणित या प्रशिक्षणाच्या पहिल्याच दिवशी सर्वच ठिकाणच्या विद्यार्थ्यांचा ‘रेकाॅर्ड ब्रेक’ सहभाग राहिला. नेमबाजी क्रीडा क्षेत्रामध्ये कारकीर्द घडवण्यास इच्छुक प्रत्येक विद्यार्थी व स्पर्धकासाठी नेमबाजी सुरक्षा प्रशिक्षण अनिवार्य असते. त्यानुषंगाने मंडळाच्या नेमबाजी विभागाद्वारे या प्रशिक्षणाचे आयोजन रविवार ५ फेब्रुवारी २०२३ राेजी करण्यात आले. नेमबाजी क्रीडा क्षेत्राचा अनुभव बघता साधारणत: एका दिवसाला एक बॅच म्हणजेच ४० विद्यार्थ्यांचा समावेश असताे.
मात्र, श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या नेमबाजी विभागाद्वारे आयोजित महाराष्ट्र रायफल असोसिएशन ‘शुटींग सेफ्टी कोर्स’ ला सर्वच ठिकाणच्या नेमबाजांनी माेठ्या संख्येने सहभाग घेत विक्रम नाेंदविला आहे. रविवारी दिवसभर एकूण तीन बॅचेस म्हणजे ९८ विद्यार्थ्यांचा सहभाग राहिला. तसेच प्रतीक्षा यादीही लांबलचक होती. प्रशिक्षणाच्या यशासाठी नेमबाजी विभाग प्रमुख व प्रशिक्षक राहुल उगले, प्रा.आनंद महाजन यांचे परिश्रम सार्थकी ठरले. यशस्वी आयोजनासाठी मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, मंडळाच्या सचिव डाॅ. माधुरी चेंडके यांचे सहकार्य लाभले. मंडळाचे उपाध्यक्ष डाॅ. श्रीकांत चेंडके, अॅड. प्रशांत देशपांडे, कोषाध्यक्ष डाॅ. सुरेश देशपांडे, कार्याध्यक्ष डाॅ. रमेश गाेडबाेले यांच्यासह सर्व पदाधिकारी, प्रशिक्षक, प्राध्यापक व कर्मचारी वृद्धांकडून शुटींग विभागाचे अभिनंदन हाेत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.