आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृषी माल:धारणीत भीषण आग; घरातील कृषी माल झाला जळून खाक ; आगीचे रौद्र रूप

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

धारणी शहरातील होळी चौकात जगदिश मालविय व त्यांच्या भावांचे एकत्रित घर आहे. हे घर आकाराने मोठे असून जुने असल्यामुळे घर बांधकामात लाकडाचा समावेश होता. याच घराला गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास आग लागली. दरम्यान आग लागताच आगीने रौद्र रूप धारण केले. या आगीत मालविय यांच्या घरातील संसारोपयोगी साहित्यासह लाखो रुपयांचे धान्य जळून खाक झाल्याचा अंदाज प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. मालविय यांच्या घराच्या वरील बाजूने आग लागली. घरात असलेले धान्य व इतर साहित्य आगीने कवेत घेतले. धारणी नगर पंचायतची अग्निशमन यंत्रणा आग लागल्यानंतर तत्काळ न पोहोचल्यामुळे आग चांगलीच वाढली. त्यावेळी नागरिकांनी पाणी टाकून आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आग वरच्या बाजूने असल्यामुळे लवकर आटोक्यात आली नाही. काही वेळानंतर अग्निशमन विभागाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. त्यानंतर अग्निशमन दल व नागरिकांच्या सहकार्याने ही आग नियंत्रणात आणली होती.

बातम्या आणखी आहेत...