आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलनासाठी नागरिक ठाम:आंदोलनासाठी शिवणी रसुलापूर येथील घरकुल लाभार्थ्यांसह बेघर नागरिक ठाम; 4 एप्रिलपासून आंदोलनाचा इशारा, आ. अडसड यांची शिवणी ग्रा.पं. व झोपडपट्टीला भेट

नांदगाव खंडेश्वर5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील शिवणी रसुलापूर येथे अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांच्या समस्या अद्यापही सोडवण्यात आल्या नसल्याने घरकुल लाभार्थ्यांसह जे नागरिक बेघर आहेत, त्यांनी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी ४ एप्रिलपासून आंदोलन करण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे. दरम्यान आमदार प्रताप अडसड यांनी शिवणी रसुलापूर येथील चिखली मार्गावरील झोपडपट्टीला भेट देत संबंधित अधिकारी व नागरिकांसोबत संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

दरम्यान, घरकुलाच्या जागेसाठी योग्य तो पाठपुरावा करण्याचे आश्वासन या वेळी आ. अडसड यांनी दिले, तर जोपर्यंत जागेचा मालकी हक्क देण्याबाबतची शासकीय प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही, असा इशारा या प्रसंगी पुरुषोत्तम बनसोड, विनोद तळेकर, संजय मंडवधरे, मनोज गावंडे, मनीष जाधव, रावसाहेब रोटे, विनोद गोंडाणे, उपसरपंच बाबाराव इंगळे, राधा सळसळे, रंजना मेश्राम, सुनीता शेंडे, शेवंता गोंडाणे, रुक्मा उके, देवी केवट, मीरा भोयर, वर्षा खंगार, लिलाबाई उपरीकर, शरद बनकर, पंच भाई शिंदे, पंडित बुरे, गोविंदा गोंडाणे, महादेव शेंडे, आकाराम मेश्राम, फकीरा खडसे, लिला भोयर, वसंता मेश्राम, यशोदा मेश्राम, रोषण खडसे, सुनीता भोयर, चंद्रकला सोनवणे, नंदा शेंडे, तुळसा गौरखेडे, नानीबाई आगरे, विजय शेंडे, राधाबाई भोयर, राजू मेश्राम, दिवाकर अंगार आदींसह नागरिकांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...