आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोषण अभियान:मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा गौरव

अमरावती7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पोषण अभियान कार्यक्रमात अमरावती जिल्ह्याची प्रभावी कामगिरी

पोषण माह अभियानात विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवल्याबद्दल अमरावती जिल्ह्याला राज्यपातळीवरील ‘सर्वोत्कृष्ट कार्यकृती’ व ‘सर्वोत्कृष्ट लोकसहभाग’ हे दोन पुरस्कार मिळाले. मुंबई येथे जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंगळवार ८ रोजी जिल्हाधिकारी पवनीत कौर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

महिला व बाल विकास विभागाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, महिला व बाल विकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, महिला व बालविकास सचिव आय. ए. कुंदन, आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना रुबल अग्रवाल, माविमच्या व्यवस्थापकीय संचालक श्रध्दा जोशी, महिला आयोगाच्या सदस्य सचिव अनिता पाटील उपस्थित होते. अमरावती येथून जिल्हाधिकारी पवनीत कौर, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, महिला व बालविकास अधिकारी डॉ. कैलास घोडके, तसेच प्रातिनिधिक स्वरूपात काही अंगणवाडी सेविका, मदतनीस , पर्यवेक्षिका आणि बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्यासह विस्तार अधिकारी उपस्थित होते.

‘सर्वोत्कृष्ट कार्यकृती’ व ‘सर्वोत्कृष्ट लोकसहभाग’
जिल्ह्याने तरंग सुपोषित महाराष्ट्राचा अभियान, माझी मुलगी माझा अभिमान, परसबाग निर्मिती , एक दिवस मेळघाटसाठी, वृद्धांचे वाढदिवस, शेवग्याच्या रोपट्यांची लागवड, लोकप्रतिनिधी दिवस असे विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून राज्यात वेगळा ठसा निर्माण केला. यासाठी गावागावातील अंगणवाडी ताई, मदतनीस, पर्यवेक्षिका यांनी समन्वयाने काम केले. बालविकास प्रकल्प अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नेतृत्वात सूक्ष्म नियोजन करून संपूर्ण जिल्हाभर सप्टेंबर महिन्यात कार्यक्रम राबविण्यात आले. या कार्यक्रमांना प्रतिसादही चांगला मिळाला. गावागावातील उपक्रमांमध्ये आबालवृद्ध सहभागी झाले. अनेक उपक्रमांनी गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. या सर्व बाबींची केंद्र शासनाच्या पोषण ट्रेकर संकेतस्थळावर नोंदही झाली.

बातम्या आणखी आहेत...