आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Amravati
  • How Burnt Fire Is Called, Extinguished Is Called Ash Bachchu Kadunchi Shayari; They Said If We Get Nadi, Paint Our Faces; Power Went To The Stove

पहिली वेळ म्हणून माफ केले:दुसऱ्यांदा प्रहारचा वार दिसेल; आमदार बच्चू कडूंचा रवी राणांना थेट इशारा, नादी लागाल तर तोंड रंगवू

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पहिली वेळ म्हणून माफ केले. आता दुसऱ्यांचा प्रहारचा वार दिसेल, असा थेट इशारा आमदार बच्चू कडू यांनी रवी राणा यांना दिला आहे. ते अमरावतीमध्ये बोलत होते.

आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत होत्या. त्यावर मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर रवी राणांनी काल सपशेल माघार घेतली. मात्र, आज बच्चू कडू यांनी शक्तिप्रदर्शन करत आपली भूमिका जाहीर केली.

सत्ता गेली चुलीत

बच्चू कडू यांनी जली को आग कहते है, बुझी को राख कहते है...हा शेर साजर करून टाळ्या मिळवल्या. आमच्या नादी लागला तर तोंड रंगवू, सत्ता गेली चुलीत असा इशाराही त्यांनी विरोधकांना दिला आहे. गेली 4 वेळेस मी आमदार म्हणून निवडून येत आहे. कारण इथे सगळे दर्दी आहेत म्हणूनच मी निवडून येतो, हे सांगायला ते विसरले नाहीत.

रक्ताचे पाणी केले

मी राजकारणासाठी रक्ताचे पाणी केले नाही, अशा माणसांवर आरोप करतात का? असा सवाल बच्चू कडू यांनी उपस्थित केला आहे. पण पहिली वेळ होती म्हणून मी माफ केले, यानंतर मात्र प्रहारचा वार दिसेल. राणांनी वक्तव्य मागे घेतले त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. राणांनी 2 पावले मागे घेतली आम्ही 4 पावले मागे घेऊ,असेही बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

जनतेसाठी सर्व करावे लागते

बच्चू कडू म्हणाले की, मंत्री असताना गुवाहटीला जाण्याची गरज नव्हती. मात्र, जनतेसाठी किंवा तत्वासाठी काही करायचे असेल तर जावे लागते. बाबासाहेबांनी सुद्धा काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला. रयतेचे राज्य आणखीन मजबूत झाले पाहिजे यासाठी तह केला पाहिजे, याला बंडखोरी नाही तर उठाव म्हणतात.

प्रहारचे 10 आमदार निवडून येणार

आगामी काळात 10 आमदार निवडून आणण्याची तयारी करत आहे, आमच्या नादी कुणी लागले तर सोडणार नाही असा इशारा कडू यांनी दिला आहे. आम्ही म्हटलो तर सरकार उठले पाहिजे, अशी प्रहारची ताकद निर्माण करायची आहे. आम्ही झेंडा हाती घेतला असला तरी तो कोणत्या धर्मांचा नाही ना कोणत्या रंगाचा तो केवळ आपले पणाचा आहे.

आमची गद्दारी कशी?

2014 मध्ये शरद पवारांनी केलेला तो उठाव आणि आम्ही केली ती गद्दारी कशी केली आहे, असा सवाल बच्चू कडू यांनी उपस्थित केला आहे. कोरोना गेला त्यानंतर भोंग्याचा विषय सुरू झाला असा टोलाही बच्चू कडूंनी लगावला आहे. मी कधी जातीपातींचे राजकारण करणार नाही असेही बच्चू कडू यांनी म्हटले आहे. तर आम्ही गांधींजींना मानतो, मात्र आमच्या डोक्यात भगतसिंग कधी पुढे येईल हे सांगता येणार नाही असेही बच्चू कडू यांनी म्हटले आहे. अडीच वर्षांत मी अनेक अनाथांना नौकरी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...