आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वच्छ भारत:बारा हजारांत शौचालय बांधणार कसे? लाभार्थ्यांना पडला प्रश्न ; अनुदान वाढवण्याची मागणी

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामीण भागात शौचालय उभारण्यासाठी १२ हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाते. मात्र, बांधकाम साहित्याचे दर वाढल्याने इतक्या कमी अनुदानात शौचालय बांधून होत नाही. आर्थिक ओढाताण होत आहे. शासनाने अनुदान वाढवून द्यावे, अशी मागणी लाभार्थ्यांकडून केली जात आहे.

हागणदारीमुक्त गावासाठी वैयक्तिक शौचालय बांधून वापरणाऱ्यांना १२ हजार रुपयांच्या अनुदान दिले जाते. यंदा जिल्हा परिषदेला ४ हजार ५४० शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार ४८४ लाभार्थ्यांनी ग्रामपंचायत, बीडीओकडे अर्ज केले. तसेच तर ४८३ जणांनी वैयक्तिकरित्या ऑनलाइन पद्धतीने अर्ज केला आहे. त्यापैकी ७० जणांचे अर्ज ग्राह्य धरण्यात आले असून ८० अर्ज हे रिजेक्ट करण्यात आले. तसेच ३३३ अर्ज प्रशासनाकडे पेंडिंग आहेत. पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून लाभार्थीच्या खात्यावर अनुदान जमा केले जाते. प्रत्येक कुटुंबाकडे शौचालय असावे यासाठी शासकीय यंत्रणेद्वारे जनजागृती केली. यामुळे जागा कमी असली तरी ग्रामीण भागातही शौचालय बांधण्याकडे कल वाढला आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत लाभार्थीला १२ हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. शौचालय बांधून पूर्ण झाल्यानंतर अनुदान संबंधित लाभार्थीच्या खात्यावर जमा केले जाते, त्यामुळे त्याला आधी जवळचे पैसे खर्च करावे लागतात. शौचालय बांधकामासाठी ४० ते ५० हजार रुपये खर्च येतो. शासनाकडून मिळणारे १२ हजारांचे अनुदान तुटपुंजे असल्याची ओरड होत आहे.

अनुदानात वाढ हाेणे गरजेचे
शौचालयासाठी शासनाकडून १२ हजारांचे अनुदान मिळते. या अनुदानात शौचालयाचे काम करणे वाढत्या महागाईमुळे शक्य नाही. त्यामुळे या अनुदानात किमान २० ते २५ हजार रुपयांची वाढ होणे आवश्यक आहे.
- अजय फिसोडे, नागरिक.

बातम्या आणखी आहेत...