आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबडनेरा पोलिस ठाण्यात जाऊन महिला पोलिस अंमलदाराशी हुज्जत घालणाऱ्या दोघांविरुद्ध दोष सिद्ध झाला. त्यामुळे येथील जिल्हा न्यायालय (क्रमांक १) च्या न्यायाधीश आय. ए. शेख नझीर यांच्या न्यायालयाने दोन्ही आरोपींना न्यायालय उठेपर्यंत शिक्षा तसेच प्रत्येकी ११ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. हा निर्णय न्यायालयाने सोमवारी (दि. १०) दिला. विधी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेश महादेव मेश्राम (४६) आणि भारतभूषण नानाजी रामटेके (४०, दोघेही रा. बडनेरा) असे शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. १८ डिसेंबर २०१४ रोजी बडनेरा पोलिस ठाण्यात उमेश मेश्राम, रामटेके हे एका व्यक्तीला जखमी अवस्थेत घेऊन गेले होते. पोलिसांनी त्या जखमी व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात पाठवले. त्यावेळी आरोपींनी पोलिस ठाण्यात उद्धट वर्तन केले. तसेच स्टेशन डायरी अंमलदार म्हणून पोलिस नाईक जया इंगळे या कार्यरत होत्या.
त्यावेळी ठाणेदार व इतर पोलिसांनी आरोपींना गैरवर्तन करु नका, रितसर तक्रार द्या, असे सांगितले मात्र, त्यांनी जया इंगळे यांना शिवीगाळ करुन त्यांना तुमच्यावर केस करेल, अशी धमकी दिली तसेच पोलिसांसोबत हुज्जत घातली. या प्रकरणी इंगळे यांनी तक्रार दिली व दोघांविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले. प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सरकारी अभियोक्ता अनुप्रिती ढवळे यांनी सात साक्षीदारांच्या साक्ष तपासल्या. यावेळी दोन्ही आरोपिविरुद्ध दोष सिद्ध झाल्यामुळे न्यायालयाने दोघांनाही न्यायालय उठेपर्यंतची शिक्षा तसेच प्रत्येकी ११ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.