आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्य शासनाने महिलांसाठी एसटीच्या प्रवास तिकिटामध्ये ५० टक्के सूट दिली आहे, तर वयोवृद्धांसाठी मोफत प्रवास केला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील ऑटोचालकांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे. त्यामुळे सरकारच्या या निर्णयाविरोधात मंगळवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (इर्विन) ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चातून ऑटो चालक व मालकांना दरमहा नऊ हजार रुपये मानधन देण्याची मागणी निवेदनातून केली. मागणी पूर्ण न झाल्यास ऑटोसह आत्मदहनाचा इशारा कपिल पडघान यांनी दिला. राज्य शासनाने महिलांकरिता एसटी बसमध्ये ५० टक्के तिकीट सुट दिलेली आहे.
तसेच ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा पूर्णपणे मोफत प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ऑटोचालक-मालकांसह त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. सोबतच ऑटो चालकांच्या मुलांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात येण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. ऑटोचालक-मालक हे बेरोजगार असून, त्यांना दुसरे कोणतेही उत्पन्नाचे साधन नसल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे म्हणणे आहे. महाराष्ट्र शासनाने ज्येष्ठ नागरिक, महिलांकरिता एसटी बसमध्ये तिकिटाची सुट दिलेली आहे.
त्यामुळे ऑटोचालकांचे व्यवसाय पूर्णतः संपण्याच्या मार्गावर आलेला आहे. त्यामुळे शासनाने ऑटोचालक - मालकांना प्रती महिना ९ हजार मानधन देण्यात यावे. दहा दिवसात निराकरण न झाल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून दिला आहे. या मोर्चामध्ये कपिल पडघान, सय्यद फारुख सय्यद चांद, प्रमोद आष्टीकर, प्रफुल बिसने, शेख वाजीद शेख जमाल, रुपेश यादव, इकबाल अहमद अमीर अहमद, राजू सोळंके, शेख जाफर शेख हुसेन, विजय यादव, अमोल घाटे, प्रतीक राऊत, ज्ञानेश्वर खोब्रागडे, दीपक शिंगाडे, मधुकर मोरे, सलीम कुरेशी, अविनाश आमले यांच्यासह मोठ्या संख्येने ऑटो चालक सहभागी होते.
जिल्हाधिकारी कार्यालयावर ऑटो चालकांनी काढलेला मोर्चा. दुसऱ्या छायाचित्रात मोर्चात सहभागी रिक्षाचालकांना संबोधित करताना संघटनेचे पदाधिकारी. मागण्या मान्य करा, अन्यथा आत्मदहनाचा इशारा राज्य शासनाने ऑटोचालकांच्या मागणीची दहा दिवसात दखल न घेतल्यास जिल्हाधिकारी कार्यालय येथे ऑटोसह आत्मदहन करणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कपिल पडघान यांनी दिला आहे. यामध्ये जिल्ह्यातील शेकडो ऑटो चालक सहभागी होणार असल्याचेही पडघान यांनी सांगितले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.