आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँकेकडे दिले चुकीचे आयएफएससी कोड अन् खाते क्रमांक:वरुडचे शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित, सदोष याद्यांमुळे मनस्ताप

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वरुड तालुक्यात या वर्षी झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेती पिकांचे व शेतजमिनीचे नुकसान झाले. त्या अनुषंगाने शासनाने वरुड तालुक्याला नुकसान भरपाईकरिता अनुदान मंजूर करून तत्काळ तहसीलदारांकडे वर्ग केले. मात्र संबंधित यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांनी तयार करून बँकेकडे सोपविलेल्या याद्यांमध्ये बहुतेक शेतकऱ्यांचे बँक खाते व आयएफएससी कोड चुकीचे असल्याने त्यांना या भरपाईपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. कर्मचाऱ्यांचया चुकीचा त्रास मात्र शेतकऱ्यांना सहन करावा लागत असल्याने त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

वरुड तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे खाते क्रमांक जमा करण्याकरिता महसूल विभागाने काही गावे तलाठी, तर काही गावे ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांच्याकडे वर्ग केली होती. त्यानुसार खाते क्रमांक व आयएफसी कोड शेतकऱ्यांकडून घेण्यात आले. त्या याद्या तहसील कार्यालयात जमा करण्यात आल्या. कार्यालयाने त्या याद्या जशाच्या तशा बँकांकडे दिल्यात. शिंदे-फडणवीस सरकारने दिवाळी आधी सर्व नुकसानग्रस्त शेतक-यांच्या बँक खात्यावर आर्थिक मदत मिळणार असल्याचे जाहीर केले होते, परंतु प्रशासनाद्वारे तयार करण्यात आलेल्या सदोष याद्यांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली. ही बाब भाजपचे तालुकाध्यक्ष राजकुमार राऊत यांच्या लक्षात येताच त्यांनी ती तहसीलदरांच्या निदर्शनास आणून देत याद्या दुरूस्त करण्याची मागणी केली.

निवेदन देत वेळी भाजप तालुकाध्यक्ष राजकुमार राउत, शहराध्यक्ष डॉ. निलेश बेलसरे, जिल्हा उपाध्यक्ष गोपाल मालपे, जिल्हा सचिव इंद्रभूषण सोंडे, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष विजय यावले, योगेश्वर खासबागे, सरचिटणीस समीर ठाकरे, रुपाली सोंडे, राजू शहाणे, शक्ती केंद्र प्रमुख संजय कोहळे, माजी नगरसेवक प्रितम अब्रुक, रवी निंभोरकर, भाजयुमो शहर उपाध्यक्ष यशपाल राउत, गोविंदा कवडेती यांच्यासह भाजप कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.

याद्या अपडेट करू, बँकांकडे पाठवू

बहुतेक शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईचे पैसे जमा झाले आहेत. जवळपास ५ ते १० टक्के शेतकरी असे आहेत, ज्यांची माहिती चुकलेली आहे. लवकरच त्यांचीही माहिती अपडेट करून ती त्वरित संबंधित बँकांकडे पाठविण्यात येईल. कुणीही शेतकरी भरपाईपासून वंचित राहणार नाही. - गजेंद्र मालठाणे, तहसीलदार, वरुड

बातम्या आणखी आहेत...