आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिराळा ते देवरा मार्गावरील एका शेतात नातेवाइकांना भेटण्यासाठी आलेल्या एका दाम्पत्याला भरधाव मिनी ट्रकने धडक दिली. या धडकेत दाम्पत्य ठार झाले आहे. दोन वर्षाच्या चिमुकल्यालासह हे दाम्पत्य दुचाकीने शेताजवळ आले. दुचाकी उभी करुन ते दुचाकीजवळ उभे असतानाच त्यांना जबर धडक दिली. हा अपघात गुरूवारी (दि. २) दुपारी घडला आहे. या अपघातानंतर मिनी ट्रक उलटल्याने त्यामधील सहा मजूरसुद्धा जखमी झाले आहे. विजय अन्नाजी शिंदे (२८) आणि रुतुजा विजय शिंदे (२४, दोघेही रा. जळका जगताप, ता. चांदूर रेल्वे) असे मृतक दाम्पत्याचे तर देवांशू विजय शिंदे (२) असे जखमी झालेल्या बाळाचे नाव आहे. शिंदे दाम्पत्य गुरुवारी दुपारी जळका जगताप गावावरुन शिराळा ते देवरा मार्गावरील एका शेतात दुचाकीने आले. या शेतात त्यांचे नातेवाइक थांबले आहेत. शेत आल्यानंतर त्यांनी दुचाकी उभी केली, पत्नी दोन वर्षाच्या मुलाला घेऊन दुचाकीवरुन खाली उतरली.
त्यानंतर विजय शिंदे यांनी दुचाकी उभी केली. दोघेही पती-पत्नी एकमेकांसोबत रस्त्याच्या बाजूला बोलत असतानाच एक भरधाव मिनी ट्रक (४०७) शिराळ्याकडून माहुलीकडे कुटार घेऊन आला व चिमुकल्यासह शिंदे दाम्पत्याला जबर धडक दिली. या धडकेत तिघेही फेकल्या गेले. यामध्ये पती-पत्नीला जबर मार बसल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर दोन वर्षीय चिमुकला जखमी झाला आहे. त्याला अमरावतीत खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर धडक देणारा मिनी ट्रक उलटला. या मिनी ट्रकमध्ये ६ मजूर होते. ते सुद्धा जखमी झाले आहेत. अपघातानंतर मिनी ट्रकचा चालक वाहन सोडून पसार झाला आहे. घटनेची माहीती मिळताच माहुली जहागिरचे ठाणेदार मिलींद सरकटे तत्काळ पथकासह घटनास्थळी दाखल झाले आहेत.
मिनी ट्रकमधील जखमी मजूर
नईम खान अफझल खान (२०), गजानन नारायण मारोटकर (३५), मोबिन खान रशीद खान (२२), अब्दुल सिद्दीकी अब्दुल रौफ (२५), सचिन रामरावजी इंगळे (३६) आणि अफरोज रशीद खान (३६, सर्व रा. माहुली जहागिर) असे जखमी झाले आहेत. हे त्या मिनी ट्रकमध्ये कामावर आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.