आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमरावती येवदा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळोद येथे एका ३९ वर्षीय व्यक्तीने कौटुंबीक वादातून पत्नीसह सासू व सासऱ्यांवर तलवारीने जीवघेणा हल्ला चढवला. या प्रकरणी हल्लेखोर जावयाविरुद्ध येवदा पोलिसांनी बुधवारी (दि. २४) गुन्हा दाखल केला आहे.
पत्नी माहेरी आली होती, ‘तू आताच माझ्यासोबत घरी चल’ म्हणत पतीने पत्नीसह सासू व सासऱ्यावर हा हल्ला केला आहे. सरला उमेश चव्हाण, रामराव तुळशीराम सोळंके आणि रामवराव यांच्या पत्नी असे तिघे हल्ल्यात जखमी झाले आहे.
उमेश जगदंबराव चव्हाण (३९, रा. पांढरी मसमापूर, ता. अंजनगाव सुर्जी) असे हल्लेखोराचे नाव आहे. पोलिस तक्रारीनुसार, तक्रारदार महिला व तिची बहीण सरला या दोघीही विवाहीत आहे. दरम्यान त्यांच्या चुलत भावाचे पिंपळोद येथे १६ मे रोजी लग्न होते. त्यामुळे त्या वडिलांकडे रामराव सोळंके यांच्या घरी आलेल्या आहेत. २३ मे रोेजी रात्री साडेआठ ते नऊ वाजता रामराव सोळंके व त्यांच्या पत्नी या गावातच असलेल्या परशुराम महाराज मंदिरात दर्शनासाठी गेले होते.
याचदरम्यान सरला बाहेरुन घरात ओरडत येत असल्याचा आवाज सरला यांच्या बहिणीला आला. त्यावेळी सरला यांची बहीण घरातच स्वयंपाक करत होती. ओरडण्याचा आवाज आल्यामुळे त्यांनी बाहेर येऊन पाहिले, तर सरलाच्या मागे तीचा पती उमेश चव्हाण हा तलवार घेऊन धावत आला व त्याने वार केला. त्यामुळे सरला खाली पडली. याचदरम्यान रामराव सोळंके व त्यांच्या पत्नी मंदिरातून घरी पोहोचले व त्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, तर उमेशने रामवरावजी यांच्या हातावर, पोटावर व शरीरावर तलवारीने सपासप वार केले.
त्यामुळे रामरावजी यांच्या पत्नी मधात गेल्या असता त्यांच्यावरही उमेशने तलवारीने हल्ला केला. उमेश मागील दोन महिन्यांपासून त्रास देत असल्याचे सरला यांनी काही दिवसांपूर्वीच बहिणीला सांगितले होते, त्याच कारणावरून त्याने पत्नी सरलासह सरलाचे आई व वडील यांच्यावर जीवघेणा हल्ला करुन त्यांना तिघांनाही गंभीर जखमी केले असल्याचे सरलाच्या बहिणीने पोलिस तक्रारीत नमूद केले आहे. या तक्रारीवरून येवदा पोलिसांनी उमेश चव्हाण विरुध्द प्राणघातक हल्ला करुन गंभीर जखमी करणे तसेच अवैध शस्त्र बाळगणे या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.