आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराश्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाला (एचव्हीपीएम) देशातील एकमेव खासगी अनुदानित क्रीडा विद्यापीठाचा दर्जा मिळाला असून आता आम्ही आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ मिळवणार असल्याची ग्वाही एचव्हीपीएम प्रधान सचिव प्रभाकरराव वैद्य, एचव्हीपीएमचे युनेस्कोमधील सल्लागार सदस्य प्रणव चेंडके यांनी शुक्रवारी स्व. सोमेश्वर पुसतकर ऑडिटोरियम सभागृहात झालेल्या पत्रपरिषदेत दिली. रशिया, कोलंबिया येथे ऑलिम्पिक विद्यापीठ असून येथे शिकण्यासाठी एचव्हीपीएम येथील विद्यार्थ्यांना संपूर्ण शिष्यवृत्ती दिली जाईल. एचव्हीपीएम क्रीडा विद्यापीठ झाल्यानंतर येथे केवळ शारीरिक शिक्षणाचेच प्रशिक्षण दिले जाणार नाही तर स्पोर्ट्स सायकलाॅजी, बायोमॅट्रीक्स, फिजिओ थेरेपी हे अभ्यासक्रम व त्यासाठी तज्ज्ञ घडविले जातील. स्पोर्ट्स इंडस्ट्रीशी संबंधित विषय. यात कमी किंमतीचे क्रीडा साहित्य तयार करण्यासाठी तज्ज्ञ घडवणे, कौशल्य शिक्षण, क्रीडा विज्ञान, क्रीडा व्यवस्थापन असे अभ्यासक्रम, योगासने, रिनोव्हेशन आॅफ इन्फ्रास्ट्रक्चर व अत्याधुनिक क्रीडा सुविधा मिळणार आहेत.
पहिला आंतरराष्ट्रीय योग अभ्यासक्रम शनिवार ११ पासून एचव्हीपीएममध्ये सुरू होत असून १५ विद्यार्थ्यांनी यासाठी प्रवेश घेतल्याची माहिती पत्रपरिषदेत देण्यात आली. क्रीडा विद्यापीठ मिळविण्याचे संस्थापक स्व. अंबादासपंत वैद्य यांनी बघितलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रभाकरराव वैद्य यांनी अथक प्रयत्न केल्याचे सूरही पत्रपरिषदेत उमटले. पत्रपरिषदेला मंडळाचे उपाध्यक्ष डाॅ. श्रीकांत चेंडके, डाॅ. गोडबोले, सचिव डाॅ. माधुरी चेंडके, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डाॅ. वाडेगावकर, डीसीपीईचे माजी प्राचार्य डाॅ. अरुण खोडस्कर, डीसीपीईचे प्राचार्य डाॅ. उदय मांजरे, मंडळाचे कोषाध्यक्ष डाॅ. श्रीनिवास देशपांडे, डाॅ. संजय तीरथकर, डाॅ. विजय पांडे व इतर उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.