आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पष्टीकरण:मी महाविकास आघाडीसोबत; आज शरद पवारांची भेट घेणार ; वरुड-मोर्शीचे आ. देवेंद्र भुयार यांचे स्पष्टीकरण

अमरावती14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यसभेच्या निवडणुकीत देवेंद्र भुयार यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान केले नसल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला. वास्तविक मी लोकसभा निवडणुकी पासूनच मविआसोबतच आहे. त्यामुळे यावेळीही मविआच्याच उमेदवारांना मतदान केले. तरीही माझ्यावर आरोप होत आहे, हा विषय गंभीर आहे. त्यामुळे मी रविवारी, १२ जूनला मुंबईत जावून शरद पवार, अजित पवार यांची भेट घेऊन या विषयावर चर्चा करणार असल्याचे वरुड-मोर्शी मतदार संघाचे आ. देवेंद्र भुयार यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले. आ भुयार म्हणाले, मी निवडून आल्यानंतर मला प्रथम शिवसेनेने त्यानंतर भाजपनेही बोलावून मंत्रिपदाचे प्रलोभन दिले मात्,र मी गेलो नाही. कारण मी शरद पवार, अजित पवार यांच्यासोबत आहे. राज्यसभा निवडणुकीच्या मतदानाबाबतही माझी भूमिका अजिबात तळ्यात मळ्यात नव्हती. माझे मतदान मविआच्या उमेदवारांनाच राहणार हे निवडणुकीपूर्वीच स्पष्ट केले होते. त्यानंतर अजित पवार यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे मविआच्या उमेदवाराला मतदान केले आहे. मात्र, संजय पवार पराभूत झाल्याचे खापर संजय राऊत माझ्या डोक्यावर फोडत आहेत, हे योग्य नाही.

बातम्या आणखी आहेत...