आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दम देणाऱ्याला घरात घुसून मारण्याची माझी हिंमत:आमदार रवी राणांचा बच्चू कडूंवर ‘प्रहार’

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आ. बच्चू कडू आणि माझ्यातील वाद मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी मिटवला आहे. मी देखील माझ्यातर्फे तो मिटवला. मात्र, जर कोणी मला दम देत असेल तर या रवी राणाने उद्धव ठाकरे यांचा दम खाल्ला नाही, बच्चू कडू तर लहान विषय आहे. ते जर दम देऊन बोलत असतील तर मग घरात घुसून मारण्याची मी हिंमत ठेवतो. त्यांना जशास तसे उत्तर देईल. ते ज्या स्तरावर म्हणतील त्या स्तरावर उत्तर देईल, असा इशारा आ. रवी राणा यांनी मुंबईहून जारी केलेल्या व्हिडिओद्वारे दिला आहे.

आ. बच्चू कडू यांनी प्रहार कार्यकर्ता संमेलनात आपण सन्मान म्हणून दोन पावले मागे आलो आहोत, असे जाहीर केले. मात्र, याचवेळी त्यांनी कोणी आडवे आले तर त्याचा कोथळा बाहेर काढू, असे विधान केले. त्यावर सध्या मुंबईत असलेले आ. रवी राणा यांनीही प्रखर प्रतिक्रिया दिली आहे. यामुळे आ. रवी राणा व आ. बच्चू कडू यांच्यातील वाद मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतरही शमला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

पहिली वेळ होती म्हणून माफ केले. पुढच्या वेळी प्रहार वार काय असतो ते दाखवीन, असा इशारा आ. बच्चू कडू यांनी आ. राणा यांना दिला होता. त्यामुळे पुन्हा एकदा शमत असलेला वाद धुमसायला लागला आहे.

तिकडे आ. राणा यांनी प्रेमाच्या भाषेवर मी एकवेळा नव्हे तर दहा वेळा झुकेन. परंतु, कोण दम देत असेल तर घरात घुसून मारायलाही कमी करणार नाही. मंत्री बनेल किंवा नाही. तो माझा अधिकार नसून माझे नेते मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचा तो आहे. त्यांचा आदर करून मी माघार घेतली. दिलगिरी व्यक्त केली. कोणाचेही मन दुखावू नये म्हणून मी संपवल्याचे म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...