आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतंत्र अपंग मंत्रालयाची मागणी मान्य केली असून, ३ डिसेंबरला जागतिक अपंग दिनी याची अधिकृत घोषणा करणार आहेत. त्यांचा हा निर्णय ऐतिहासिक आहे. दिव्यांग मंत्रालयाचा मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली तर आनंद होईल, असे माजी मंत्री आणि विद्यमान आमदार बच्चू कडू यांनी सांगितले.
दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावे,अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार. बच्चू कडू मागील अनेक वर्षांपासून करत होते. त्यांची ही मागणी अखेर शिंदे-फडणवीस सरकारने मान्य केली आहे. शनिवारचा (ता.१२) रोजी गाडगेनगर येथील संत गाडगेबाबा मंदिर परिसरातील सभागृहात जल्लोष सभा पार पडली.
सभेच्या अध्यक्षस्थानी आमदार बच्चू कडू होते. अतिथी म्हणून प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष छोटू महाराज वसु, प्रहार प्रणित अपंग क्रांती आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्याम राजपूत, प्रहार जनशक्ती पक्षाचे महानगराध्यक्ष बंटी रामटेके, चंदू खेडकर, गोलू पाटील, राजा ठाकरे, मोहम्मद नौशाद, प्रवीण हेडवे, गुड्डू ढोरे यांच्यासह दिव्यांग बांधव व्यासपीठावर उपस्थित होते. बच्चू कडू भाषणात म्हणाले की, दिव्यांगाच एक स्वप्न होत अखेर पूर्ण झाले आहे. यासाठी मी अनेक आंदोलने केली,
कडूंंना खांद्यावर घेत कार्यकर्त्यांनी धरला ठेका
गुवाहाटीला खोके नाही, तर दिव्यांग बांधवांच्या वेदना घेऊन गेलो, असे कडू यावेळी म्हणाले. तत्पूर्वी आमदार बच्चू कडू यांच्यासह शेकडो दिव्यांग बांधवांनी फटाक्यांची आतषबाजी व ढोलताशांचा गजर करत जल्लोष व्यक्त केला. तसेच यावेळी लाडू वाटपही करण्यात आले. तर कार्यकर्त्यानी कडू यांना खांद्यावर घेऊन भन्नाट डान्स केला. दिव्यांग बांधवांच्या वतीने बच्चू कडू यांच्यावर फुलांचा वर्षाव करून त्यांचे जंगी स्वागतही यावेळी करण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.