आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गून्हेवृत्त:‘मी तुझ्यासोबत लग्न करेन!’ बंदुकीच्या धाकावर मुलीकडून स्टॅम्प पेपरवर घेतले लिहून, विवाहित युवकाला पोलिसांनी केली अटक

अमरावती3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोन वर्षांपूर्वी एका युवकाची गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीतील अल्पवयीन युवतीसोबत ओळख झाली. यातून त्यांची एकमेकांसोबत बोलचाल सुरू होती. दरम्यान, दीड वर्षांपूर्वी युवकाने बंदुकीचा धाक दाखवून या अल्पवयीन युवतीकडून थेट स्टॅम्प पेपरवर मी तुझ्यासोबत लग्न करेल, तसेच १८ वर्षांची झाल्यावर पळून जाऊ, असे लिहून घेतल्याची तक्रार अल्पवयीन युवतीच्या नातेवाइकाने गाडगेनगर पोलिसांत दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी विवाहित युवकासह त्याच्या महिला नातेवाईकाविरुद्ध पोस्कोसह इतर गुन्हे दाखल करुन त्या युवकाला शनिवारी (दि. २६) अटक केली आहे.

सैय्यद सोहेल सैय्यद गफ्फार (२३, रा. चांदणी चौक) व एक महिला असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. सैय्यद सोहेल व पीडित युवतीची सुमारे दोन वर्षांपूर्वी शहरातील गाडगे बाबा मंदिर परिसरात ओळख झाली होती. त्यानंतर या युवकाची व पीडित युवतीची बोलचाल सुरू झाली. दरम्यान, १९ ऑगस्ट २०२० ला सैय्यद सोहेलने बंदुकीचा धाक दाखवून माझ्या अल्पवयीन मुलीकडून १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर लिहून घेतले की, मी तुझ्यासोबत लग्न करेल, तसेच १८ वर्षांची झाल्यानंतर आपण दोघे पळून जाऊ. दरम्यान, त्यानंतर सैय्यद सोहेलची एक महिला नातेवाईक मुलीच्या घरी जाऊन पीडितेच्या वडिलांना म्हणाली की, तुमच्या मुलीला सांभाळा नाहीतर सै. सोहेल मुलीला पळवून घेऊन जाईल. तसेच पीडितेच्या वडिलांच्या मोबाइलवर काही छायाचित्रसुद्धा पाठवले. सैय्यद सोहेल हा गुंडप्रवृत्तीचा असून, त्याच्या हातात तलवार व बंदूक असलेले फोटो तो नेहमी पाडितेच्या वडिलांच्या मोबाइलवर पाठवतो, अशी तक्रार पीडितेच्या वडिलांनी गाडगेनगर पोलिसांत दिली आहे. या प्राप्त तक्रारीवरून पोलिसांनी सैय्यद सोहेल सैय्यद गफ्फार याच्यासह संबंधित ‘त्या’ महिलेविरुद्ध धमकी देणे, विनयभंग करणे, घरात प्रवेश करणे तसेच पोस्को कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी सैय्यद सोहेलला अटक केली असल्याची माहिती गाडगेनगर पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, शहरासह जिल्ह्यात अशा प्रकारे अल्पवयीन मुलींना लग्नासाठी धमकावण्याचे प्रकार अलीकडे वाढले आहेत.

प्रकरणाचा सखोल तपास सुरू
या प्रकरणात पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करुन एकाला अटक केली आहे. या प्रकरणात सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. -आसाराम चोरमले, ठाणेदार, गाडगेनगर.

बातम्या आणखी आहेत...