आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादहावीच्या जाहीर झालेल्या निकालामध्ये शहरातील आदर्श हायस्कूलची विद्यार्थीनी राधिका सगणे ९७.६० टक्के गुण घेवून तालुक्यातून प्रथम आली असल्याची प्राथमिक माहिती आहे, तर दुसरीकडे शहरातील प्रबोधन विद्यालयाच्या निकालाची टक्केवारी थोडी घसरली असून, दर्यापूर तालुक्याचा एकूण निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. या निकालात मुलींनीच घवघवीत यश मिळवत बाजी मारली आहे. आदर्श हायस्कूलचा एकूण निकाल ९९.६३ टक्के लागला आहे. त्यामध्ये संस्कार खरड ९६.८० व गितेश कल्हाने ९६.टक्के गुण घेवून अनुक्रमे द्वितीय व तृतीय आले आहेत, तर श्रद्धा कराळे हिला ९५ टक्के गुण मिळाले. शहरातील प्रबोधन विद्यालयाचा एकूण निकाल ९७.४३ टक्के लागला आहे. यामध्ये सलोनी राजूरकर ही ९७.२० टक्के गुण घेवून विद्यालयातून प्रथम आली आहे. प्रणाली सपकाळ ९६, राज नंदिनी प्रांजळ ९५.२० टक्के गुण घेत अनुक्रमे द्वितीय व तृतीयस्थानी आहे. रत्ना बाई राठी हायस्कूलचा निकाल ९८.६० लागला. याशिवाय काशीबाई अग्रवाल विद्यालय येवदा (९९.६६), खल्लार हायस्कूल (९७.५६), दारापूर हायस्कूल (९६), राष्ट्रीय विद्यालय टोंगलाबाद (९७.९१), नगर परिषद उर्दु हायस्कूल दर्यापूर (९७.४३), नारायण गुरू महाराज माध्यमिक विद्यालय कळाशी, तुळशीरामजी पाटील विद्यालय नालवाडा, शिवाजी हायस्कूल रामतीर्थ, श्रीमती कोकीळाबाई गावंडे विद्यालय बाभळी, जवाहरलाल विद्यालय शाळा, प्रगती विद्यालय वरुड बु., शालिग्रामजी जावरकर विद्यालय सासन, गिरिजाशंकर विद्यालय चंद्रपूर, ज्ञानपीठ कॉन्व्हेंट, सिकची एज्युकेशन ॲकॅडमी दर्यापूर, विकास विद्यालय वडनेर गंगाई व श्री शिवाजी हायस्कूल भामोद या शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. दहावीतील विशेष नैपुण्य प्राप्त व गुणवंत विद्यार्थ्यी आपल्या यशाचे श्रेय प्राचार्य, मुख्याध्यापक, वर्गशिक्षक, विषय शिक्षक व आईवडिलांना देतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.