आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Amravati
  • If The Sloganeering Against The State Government, The Notice Was Made; BJP Protests Against Notice Issued To Devendra Fadnavis | Amravati Marathi News

भाजपकडून निषेध:राज्य शासनाविरोधात घोषणाबाजी तर नोटीसीची केली होळी ; देवेंद्र फडणवीसांना आलेल्या नोटीसचा भाजपकडून निषेध

अमरावती7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

फोन टॅपिंग प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना नोटीस बजावण्यात आली. त्याद्वारे फडणवीस यांना रविवारी चौकशीसाठी बीकेसी पोलिस ठाणे, सायबर विभाग, बांद्रा येथे बोलावण्यात आले. या घटनेचा भाजप शहर जिल्ह्याच्या वतीने या गैरकृत्याचा निषेध केला. तसेच यावेळी राजकमल चौकात फडणवीस यांना देण्यात आलेल्या नोटीसीची कार्यकर्त्यांकडून होळी करण्यात आली.

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत वेगवेगळ्या मुद्यांवर भाष्य केले. देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनात रविवारी राजकमल चौकात भाजपकडून शक्ती प्रदर्शन करीत राज्य शासनाचा निषेध करण्यात आला. भाजप शहर जिल्हा अध्यक्ष किरण पातुरकर यांचा नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात आ. प्रताप अडसड, निवेदिता चौधरी, रवि खांडेकर, डॉ. नितीन धांडे, भाजप प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, महापौर चेतन गावंडे, प्रशांत शेगोकार, राजेश पाठक, रविराज देशमुख, गजानन देशमुख, मंगेश खोंडे, राजु कुरील, सचिन रासने, योगेश वानखडे, लता देशमुख, लविना हर्षे, श्रद्धा गहलोद, शिल्पा पाचघरे, रश्मी नावंदर, भारती गायकवाड, रोशनी वाकले, भारत चिखलकर, ललीत समदुरकर, राजेश गोयंका, राजु राजदेव, अशोक नागवाणी, सचिन नाईक, डॉ प्रणय कुळकर्णी, जयंत डेहणकर, रिता मोकलकर, किशोर जाधव, राजेंद्र मेटे ,राजेश किटुकले, डॉ विरेंद्र ढोबळे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...