आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना अनेक अडथळ्यांना पार करत, मोहाच्या क्षणांना बळी न पडता, आयुष्याचा आनंद लुटत गांभीर्याने शिकले पाहिजे. येणाऱ्या संकटांचा सामना केला पाहिजे. आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव सदैव ठेवली पाहिजे. इमानदारीने मेहनत करून आपले ध्येय गाठले पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये दुर्दम्य इच्छाशक्ती असेल, तरच भविष्यातील आव्हाने पेलता येतील. आपल्या सभोवतीचे जग हे आपल्याला ओरबडायला निघाले आहे.
सदैव डोळे उघडे ठेवून जगाकडे बघायला पाहिजे. जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन शिक्षणातून, वाचनातून विकसित होतो. वाचनातून व अनुभवातून सभोवताल समजून घेतला पाहिजे, असे प्रतिपादन प्रा. चक्रधर कोठी यांनी केले. श्रीमती नरसम्मा कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील मराठी विभागातर्फे आयोजित मराठी भाषा व वाङ््मय मंडळाच्या उद््घाटनाच्या कार्यक्रमांमध्ये मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते. प्रा. चक्रधर कोठी पुढे असे म्हणाले, आठशे वर्षांपूर्वी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी मराठी भाषेला ज्ञानभाषेचा धर्म भाषेचा दर्जा दिला.
महाराष्ट्र प्रदेशाबद्दल आदर व अभिमान बाळगला. विदर्भातील रिद्धपूर येथे श्री चक्रधरांच्या प्रेरणेतूनच महानुभाव वाङ््मयाची विपुल निर्मिती झाली. महानुभाव लेखकांनी अनेक साहित्य प्रकार हाताळून मराठी भाषेचे ग्रंथदालन समृद्ध केले. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश चंदनपाट उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मराठी विभाग प्रमुख डॉ. अण्णा वैद्य यांनी मराठी भाषा व वाङ््मय मंचाद्वारे वर्षभर राबवण्यात आलेल्या कार्यक्रमाची माहिती दिली. नव नियुक्त मराठी भाषा व वाङ््मय मंडळ अध्यक्ष म्हणून प्राची ब्राह्मणे हिचे बुके देऊन प्राचार्यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाला इतिहास विभागप्रमुख डॉ. राठोड व इतर प्राध्यापक मंडळी तसेच कला शाखेचे विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी चिलुलकर, तर आभार डॉ. पंकज वानखेडे यांनी केले.
स्पर्धेतील विजेत्यांना केले सन्मानित
हस्ताक्षर स्पर्धेत जान्हवी पाटील, साक्षी चौधरी, प्रिया कुरील, वैष्णवी चिलुरकर तसेच मराठी भाषा गौरव दिवसाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या मराठी भाषा सामान्य ज्ञान स्पर्धेत सहभागी धनश्री सावरकर, चेतन ताथोड या विजेत्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.