आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हातभट्ट्या उद्ध्वस्त:अवैध दारूच्या हातभट्ट्या केल्या उद््ध्वस्त; मध्यप्रदेश व महाराष्ट्र पोलिसांची कसबा, भैसदेही गावांत संयुक्त कारवाई

परतवाडा/ चांदूर बाजारएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र व मध्य प्रदेशाच्या सीमेवरील शिरजगाव कसबा व भैसदेही पोलिस स्टेशन हद्दीला लागून असलेल्या परिसरात अवैध गावठी दारूचा व्यवसाय केल्या जात असल्याने मध्यप्रदेश व महाराष्ट्र पोलिसांनी गुरूवारी (दि. ८) संयुक्त कारवाई करीत जवळपास ८ ते १० अवैध गावठी दारूच्या हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या आहेत.सण, उत्सवाच्या औचित्यावर अवैध दारू विक्रीला उधाण येते.

अशा अवैध व्यवसायांवर प्रतिबंध लागावा याकरिता दोन्ही राज्यातील पोलिस प्रशासनाने संयुक्तरित्या कारवाई करीत खोमई व सुपाळा गावातील अडणा नदीपात्रातील व नाल्यातील अवैध गावठी दारूच्या हातभट्ट्या तसेच १६० रबरी ट्युबमध्ये असलेला मोहाचा सडवा व दारू काढण्याचे साहित्य नष्ट केले. ही कारवाई पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ, अप्प्पर पोलिस अधीक्षक शशीकांत सातव, अचलपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी अतुल नवगिरे, भैसदेहीचे उपविभागीय पोलिस अधिकारी शिवचरण भाईट, पोलिस निरीक्षक तपन कोल्हे, तसेच भैसेदेही पोलिस ठाण्याचे ठाणेदार सतीश अदमान, शिरजगाव कसबाचे पोनि प्रशांत गिते, अमोल मानतकर, नीलेश घोगरे, गजेंद्रसिंह चव्हाण आदींनी केली.

बातम्या आणखी आहेत...