आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारूची अवैध विक्री:पुसदा येथे थेट किराणा दुकानातून देशी-विदेशी दारूची अवैध विक्री; पोलिस आयुक्तांच्या विशेष पथकाची कारवाई

अमरावती5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वलगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पुसदा येथे चक्क किराणा दुकानातून देशी व विदेशी दारूची विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी (दि. ३१) रात्री उघडकीस आला. पोलिस आयुक्तांच्या विशेष पथकाने दुकानावर धाड टाकून अवैध दारु विक्रेत्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ५ हजार ४९० रुपयांचा साठा जप्त केला.

प्रवीण गंगाधर चोपडे (२८, रा. पुसदा) असे अवैध दारु विक्रेत्याचे नाव आहे. प्रवीणचे गावातच किराणा दुकान आहे. प्रवीण हा या दुकानातून देशी व विदेशी दारूची विक्री करीत होता. त्याचा हा गोरखधंदा बऱ्याच दिवसांपासून सुरू होता. याबाबत गस्तीवर असलेल्या पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाला माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर विशेष पथकाने गुरुवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास या दुकानावर धाड टाकली.

या कारवाईत प्रवीण चोपडे याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून देशी व विदेशी दारू असा एकूण ५ हजार ४९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ताब्यातील युवक व जप्त मुद्देमाल पुढील कारवाईसाठी वलगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. ही कारवाई विशेष पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश इंगळे, सुभाष पाटील, जहीर शेख, रणजित गावंडे, रोशन वऱ्हाडे, सूरज चव्हाण, राजीक रायलीवाले, निखिल गेडाम यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...