आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाळू वाहतूक:अवैध वाळू वाहतूक करणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

चांदूरबाजारएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अवैध वाळू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करुन दोघांना ताब्यात घेतले. दरम्यान, महसूल विभागाने कारवाई करणे आवश्यक असताना त्या खात्याचे काही अधिकारी जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने शासनाचा महसूल बुडत आहे. ही बाब लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी योग्य ती पावले उचलावीत, अशी मागणी पुढे आली आहे.

अचलपूर पोलिस स्टेशन हद्दीतील चांदूर बाजार नाका-अचलपूर रस्त्यावरील आरएस फ्रूट कंपनीसमोर ही कारवाई करण्यात आली. बुधवारी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अचलपूर विभागात गणेशोत्सवाचा बंदोबस्त करत होते. त्या पथकास मिळालेल्या माहितीवरून एक ट्र्रॅक्टरचालक विनापरवाना रेती चोरून वाहतूक करत होता. पोलिसांनी लगेच त्या दिशेने धाव घेऊन ट्रॅक्टर ट्रॉलीसह चालक सुरेश तुळशीराम फिसके (४०) व शेख वसीम शेख कलिम (२३) या दोघांना ताब्यात घेतले. ट्रॅक्टर मालक मतीन खान हुसेन खान (३०) फरार झाला. हे तिघेही अचलपुरचे रहिवासी असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याशिवाय ट्रॅक्टरमधील एक ब्रास रेतीही जप्त करण्यात आली. ट्रॅक्टरची किंमत ५ लाख रुपये आणि वाळू अंदाजे ६ हजार रुपये अशाप्रकारे पोलिसांनी एकूण ५ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. ही कारवाई अमरावती जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत सातव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक तपन कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक रामेश्वर धोंडगे, पोलिस उपनिरीक्षक मुलचंद भांबुरकर, सहायक पोलिस उपनिरीक्षक दीपक उईके, नाईक युवराज मानमोठे, मंगेश लकडे, स्वप्नील तंवर, नितेश तेलगोटे यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...