आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुचाकीने पाठलाग‎:अवैध सागवान पकडले, महाराष्ट्र,‎ एमपी वन विभागाची संयुक्त कारवाई‎

परतवाडा16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

परतवाडा‎ मध्य प्रदेशातील वन विभागाच्या‎ कर्मचाऱ्यांनी अवैध सागवान‎ तस्करी करणाऱ्या वाहनाचा‎ पाठलाग करून महाराष्ट्रातील‎ परतवाडा येथील वनाधिकाऱ्यांना‎ याबाबत माहिती दिली. या वेळी‎ तत्काळ नाकाबंदी करून अवैध‎ सागवानासह चारचाकी वाहन‎ ताब्यात घेण्यात वन विभागाला यश‎ मिळाले आहे. या वेळी वाहनाचा‎ पाठलाग करताना मध्य प्रदेशातील‎ वन कर्मचाऱ्यांच्या दुचाकीला‎ अपघात झाला व कर्मचारी जखमी‎ झाला आहे.‎ जखमी वन कर्मचारी बऱ्हाणपूर‎ येथील असून तिलकसिंह गोयल‎ असे त्यांचे नाव आहे.

त्यांना‎ उपचारासाठी रुग्णालयात दाखल‎ केले. परतवाडा-धारणी मार्गाने‎ मध्य प्रदेश सीमा क्षेत्रातून बुरडघाट,‎ धारखोराकडे मध्य प्रदेशातील‎ बऱ्हाणपूर गावालगत असणाऱ्या‎ ससोदा येथून अवैध सागवान‎ वाहतूक करत एक चारचाकी वाहन‎ १९ नोव्‍हेंबरला रात्री परतवाड्याच्या‎ दिशेने निघाल्याची माहिती मध्य‎ प्रदेश व महाराष्ट्र वन विभागाला‎ मिळाली होती.

त्यावेळी परतवाडा,‎ धारणी मार्गावरील संजीवनी‎ धाब्यालगत व वडुरा, बेलखेडा‎ मार्गावर नाकाबंदी केली. या‎ वाहनाच्या मागोमाग मध्य‎ प्रदेशातील वन कर्मचारी दुचाकीने‎ येत असताना त्यांच्या दुचाकीचा‎ अपघात झाला. याचवेळी अवैध‎ सागवान असलेल्या वाहनाला‎ वडुरा नजीक सहायक वनरक्षक‎ कमलेश पाटील यांनी चालकासह‎ वाहन ताब्यात घेतले. हे वाहन मध्य‎ प्रदेशातील सावलमेंढा वनपरिक्षेत्र‎ अधिकाऱ्यांच्या स्वाधीन केले.

ही‎ कारवाई सिपना वन्यजीव विभागाचे‎ उपवन संरक्षक दिव्या भारती,‎ दक्षिण बैतुल वन विभागाचे उपवन‎ संरक्षक विजयानंतम टी. आर.,‎ मेळघाट प्रादेशिक उपवन संरक्षक‎ गिन्नीसिंह, उपवन संरक्षक‎ चंद्रशेखरन बाला यांच्या‎ मार्गदर्शनात सहायक वनसंरक्षक‎ कमलेश पाटील, मध्य प्रदेशातील‎ सहायक वनसंरक्षक आशिष‎ बनसोड, परतवाडा वन परिक्षेत्र‎ अधिकारी प्रदीप भड, वनपरिक्षेत्र‎ अधिकारी मदन लोखंडे, पवन‎ बावनेर, वनपाल पी. एम. उमक,‎ धनंजय पांडे, रोशन मकेश्वर,‎ चंद्रकिरण

बातम्या आणखी आहेत...