आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेवृत्त:चांदूर बाजार तालुक्यात रेती घाटात दिवसा अवैधरित्या वाळूची वाहतूक

चांदूर बाजार4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्याला मध्य प्रदेशची सीमा लागून आहे. त्यात अनेक मोठ्या नद्या असल्याने या ठिकाणी वाळू घाटामधून वाळूची अवैध उचल केली जात आहे. शिरजगाव कसबासह तालुक्यात येथून गौण खनिजाची नियमबाह्य वाहतूक होत असतानाही त्यावर कारवाई होत नसल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. वाळूच्या अवैध वाहतुकीसाठी भरधाव वाहने दामटण्यात येत असल्याने रस्त्यांची पार चाळणी झाली असून ती नागरिकांच्या जीवावर उठली आहे. त्यावर महसूल प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

माहिती घेवून कारवाई करू
संबधित गौण खनिजदाराला तहसीलमधून परवानगी देण्यात आली आहे का, याबाबत माहिती घेतो. अन्यथा त्याच्यावर उचित ती कारवाई करण्यात येईल.
धीरज स्थूल, तहसीलदार

बातम्या आणखी आहेत...