आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:गौण खनिजाची अवैध वाहतूक; दोन ट्रक, एक जेसीबी जप्त

धामणगाव रेल्वे3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

धामणगाव रेल्वे गौण खनिज पथकाने बुधवारी धडक कारवाई करताना रेती, मुरुमाची अवैधपणे वाहतूक करणारे दोन ट्रक व एक जेसीबी जप्त केला. गौण खनिज पथकाने रात्री ३.३० वाजता कारवाई करताना मौजा देवगाव येथे एमएच-२७ डीसी ५९४९ क्रमांकाचा एक ट्रक विना परवाना चार ब्रास रेतीची अवैधरीत्या वाहतूक करतांना आढळून आला. ट्रक मालकाचे नाव सागर गाढवे असून त्याने कारवाईत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. ही कारवाई धामणगाव रेल्वे तहसीलदार वैशाख वाहूरवाघ यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.

त्याचप्रमाणे मौजा तरोडा येथे एमएच ४० सीडी १७६६ क्रमांकाचा एक ट्रक चार ब्रास मुरुमाची अवैधपणे वाहतूक करतांना आढळला. ट्रक मालकाचे नाव अनुप दिवाकर महल्ले रा-मंगरूळ दस्तागिर आहे. तसेच एमएच ४५ एएल -६९४२ क्रमांकाचे जेसीबी वाहन मुरुमाचे उत्खनन करताना आढळले. जेसीबी मालकाचे नाव पांडू कांबळे रा.नारगावडी ता. धामणगाव रेल्वे आहे. ही कारवाई धामणगाव रेल्वे मंडळाचे मंडळ अधिकारी देविदास उगले, तलाठी गोपाळ नागरीकर, तलाठी दिनेश ठाकरे, तलाठी विजय वानखडे, तलाठी विनोद मस्के, तलाठी शुभांगी मेश्राम, तलाठी सारिका रघुवंशी, तलाठी श्रीकृष्ण मसराम यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...