आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहकार क्षेत्र मोडकळीस येण्याची भीती:जिल्ह्यातील 168 सेवा सहकारी संस्थांचे‎ अवसायन तत्काळ रद्द करा : आ. ठाकूर‎

अमरावती‎8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील १६८ सेवा सहकारी‎ संस्थांच्या अवसायन नोटीस काढण्यात‎ आल्या आहेत. यामुळे संपूर्ण सहकार‎क्षेत्र मोडकळीस‎येण्याची भीती‎निर्माण झाली.‎त्यामुळे या‎अवसायन नोटीस‎तत्काळ रद्द कराव्या,‎ अशी मागणी आमदार ॲड. यशोमती‎ ठाकूर यांनी सहकार मंत्री अतुल सावे‎ यांना दिलेल्या पत्रातून केली आहे.‎ मंगळवार, १४ मार्च रोजी आ. ॲड.‎ यशोमती ठाकूर यांनी हे पत्र सहकार‎ मंत्र्यांना दिले. याबाबत भूमिका‎ मांडताना त्या म्हणाल्या की, सभेत या‎ विषयावर चर्चा होते, लगेचच सभेचे‎ इतिवृत्त तयार होते अन् त्यावर सहकार‎ व पणन विभाग, जिल्हा निबंधक व‎ संबंधित उपनिबंधक जलदगतीने‎ अवसायन नोटीस काढतात, असा‎ अफलातून प्रकार सध्या सुरू आहे.‎

परंतु यामुळे संपूर्ण सहकार क्षेत्र मोडीत‎ निघण्याची भीती निर्माण झाली असून‎ सोबतच गावा-गावातील कर्जदार‎ शेतकरी हतबल होत आहेत. विशेष‎ म्हणजे हा सर्व प्रकार पाहता सहकार‎ क्षेत्र जाणीवपूर्वक मोडकळीस‎ आणण्याचे एक षड्यंत्र तर नाही ना,‎ असा संशय येतो. त्यामुळे ही गंभीर‎ बाब तातडीने विचारात घेऊन‎ जनहितार्थ निर्णय घेतला जावा, अशी‎ मागणीही त्यांनी सहकार मंत्र्यांकडे‎ नोंदवली.‎ शेतकऱ्यांसाठी गाव पातळीवरील‎ सेवा सहकारी संस्था महत्त्वाच्या‎ असतात. कारण याच संस्थांमार्फत‎ शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत असते.‎ तसेच सहकार क्षेत्रातील हा महत्त्वाचा‎ घटक आहे. मात्र या संस्थाच जर‎ अवसायानात निघाल्या तर याचा‎ दुरगामी परिणाम सहकार क्षेत्राच्या‎ वाढीवर होऊ शकतो. या सर्व बाबींचा‎ विचार करून अमरावती जिल्ह्यातील‎ ज्या १६८ सहकारी संस्था अवसायनात‎ काढण्याची ३ मार्च २०२३ च्या नोटीस‎ तत्काळ रद्द करावी, अशी मागणी‎ आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांनी‎ या पत्रातून केली आहे.‎

बातम्या आणखी आहेत...