आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउमरखेड तालुक्यातील ढाणकी शहराला वाढीव पाणी पुरवठा योजना मंजूर झाली. या योजनेचे काम सुरू आहे, परंतू बहुतांश जलवाहिनी वन विभागाच्या हद्दीतून येणार आहे. यासाठी वन विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र त्वरीत द्यावे, अशी मागणी ढाणकी नगर पंचायत नगराध्यक्षांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली. मुनगंटीवार नुकतेच उमरखेड न. प. विविध विकास कामाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी आले होते. ढाणकीची पाणी टंचाई ही सर्वश्रुत आहे. ती कायम स्वरूपी दुर करण्यासाठी अनेक उपाय योजना केल्या, परंतू पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागलाच नाही.
त्यामुळे महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियानांतर्गत अमडापूर येथील धरणावरून ३५ हजार लोकसंख्या असलेल्या ढाणकी शहराला वाढीव पाणी पुरवठा योजना मंजूर झाली. या योजनेची पाइपलाइन पैनगंगा अभयारण्यातून ढाणकी येथील हद्दीत भिमटेकडीच्या डोंगराच्या पायथ्याशी प्रस्तावित असलेल्या जलशुद्धीकरण केंद्र मार्ग घमापूर, कुरळी, टेंभुरदरा व खरूस राज्य मार्गाच्या लगत सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्त्याच्या कडेने टाकण्याचे प्रस्तावित आहे. टेंभुरदरा ते अमडापूर धरण हे अंतर ७ किलोमीटर अंतर बिटरगाव वन परिक्षेत्रातील पैनगंगा अभयारण्य कार्यक्षेत्रात येते.
या योजनेच्या पाइपलाइन टाळण्याकरता वन खात्याचे ना-हरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे. वनविभागाकडे संपूर्ण दस्ताऐवज प्रस्तावित आहे. तो लक्षपूर्वक हाताळून एनओसी द्याीव, अशी मागणी वन मंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. वन संरक्षण व संगोपन साधन, संपत्तीचे सुलभ व सोयीने रक्षण करण्यासाठी उपवनरक्षक अधिकारी कार्यालय ढाणकी येथे सुरू करावे, बिटरगाव अभयारण्यात समाविष्ट खरबी, कोरटा, मोरचंडी, बिटरगाव हे एकुण चार वन परिक्षेत्र कार्यालय पैनगंगा अभयारण्यात विभागले आहेत, परंतु उमरखेड पासून ६० ते ७० किलोमीटर दुर आहे. त्यामुळे वन विभागाच्या अधिकाऱ्यांना उमरखेड वरून आपल्या कार्यक्षेत्रात जाण्यासाठी कसरत करावी लागते. हे कार्यालय ढाणकी येथे सुरू झाल्यास अधिकाऱ्यांना ७० ते ८० किलोमीटरचा प्रवास दररोज कापावा लागणार नाही, आदी मागण्यांचे निवेदन नगराध्यक्ष सुरेश जयस्वाल यांनी वनमंत्र्यांना दिले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.