आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अचलपूर शहरात दोन दिवस मंडळांच्या गणपतींचे विसर्जन:ड्रोन व सीसीटीव्ही कॅमेरे ठेवणार नजर; गल्लीबोळीतील रस्ते राहणार बंद

अमरावती19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अचलपूर शहरातील गणपती विसर्जना दरम्यान कुठलीही अनुचित घटना होऊ नये याकरिता गणेश विसर्जनासाठी बंदोबस्ताचे चोख करण्यात नियोजन आले आहे. शुक्रवारी (ता. ९) अचलपूर, परतवाडा व सरमसपुरा पोलिस स्टेशन हद्दीतील ३७, तर शनिवारी ४६ सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपतींचे विसर्जन करण्यात येणार आहे.

अचलपूर शहरातल गणपती विसर्जनासाठी दुल्हागेट, सोनवाल चौक, चावलंमंडी, आलमगिरी चौक, फुटी मस्जीद, पोलिस स्टेशन चौक, देवडी बुध्देखॉ चौक, गांधीपूल हा मिरवणुकीचा मार्ग निश्चीत करण्यात आला असून या मार्गावर जड वाहनांना प्रवेश निषेध करण्यात आला आहे. मिरवणूकी दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी म्हणून त्या मार्गावरील गल्लीबोळा बॅरीकेटसने बंद करण्यात आले आहे.

संपुर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी ५ टॉवर, ६ ड्रोनची मदत घेण्यात येणार असून मिरवणूक मार्गावरील मस्जिदींसमोर विशेष कापडांची झालर लावण्यात आली आहे. कुठलीही अनुचित घटना होवू नये याकरीता पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ हे शहरात स्वत: तळ ठोकून राहणार आहे.

निर्माल्य संकलनासाठी पालिकेचे ट्रॅक्टर

अचलपूर नगर पालिकेने गणपती विसर्जनासाठी सापन नदीवरील श्रीकृष्ण पुल, बदाम डोह, तर जीवनपूरा येथील बिच्छन नदीवर विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सापन नदी, सावळी व गोंडविहीर येथे दिव्यांची व इतर व्यवस्था करण्यात आली आहे. गणेश भक्तांनी गणपती विसर्जनादरम्यान निर्माल्य नदीत न टाकता पालिकेच्या ट्रॅक्टरमध्ये संकलीत करावे असे आवाहन मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांनी केले आहे.

पालिकेकडून व्यवस्था

अचलपूर नगर पालिकेच्या वतीने गणपती विसर्जनादरम्यान सिसीटीव्ही कॅमेरे, बॅरीकेटस, खड्ड्यांची दुरूस्ती करण्यात आली आहे. मोकाट जनावरांना रस्त्यावरून इतरत्र बंदीस्त करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे विद्युत्त दिवे लावण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...