आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षात फेकल्या होत्या खुर्च्या‎:सात वर्षांपूर्वीच्या प्रकरणात‎ नगरसेवकाला 2 वर्ष शिक्षा‎

अमरावती‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सात वर्षांपूर्वी चांदूर रेल्वे नगर‎ परिषद मुख्याधिकारी यांच्या‎ कक्षात खुर्च्यांची फेकाफेक करून,‎ शासकीय कामात अडथळा निर्माण‎ केल्याप्रकरणी दोष सिद्ध‎ झाल्यामुळे तत्कालीन एका‎ नगरसेवकाला येथील जिल्हा‎ न्यायाधीश क्रमांक ६ एस. बी.‎ जोशी यांच्या न्यायालयाने दोन वर्ष‎ सश्रम कारावासाची शिक्षा‎ ठोठावली. हा निर्णय न्यायालयाने‎ शनिवार, ४ फेब्रुवारीला दिला. या‎ निर्णयाने जिल्ह्यातील राजकीय‎ वर्तुळात खळबळ उडाली.‎ विधी सूत्रानुसार, बंडू‎ पुंडलिकराव आठवले (रा.‎ मिलिंदनगर, ता. चांदूर रेल्वे) असे‎ शिक्षा झालेल्या तत्कालीन‎ नगरसेवकाचे नाव आहे. ही घटना‎ चांदूर रेल्वे पोलिस ठाण्याच्या‎ हद्दीतील नगर परिषद कार्यालयात‎ २२ जुलै २०१५ रोजी घडली होती.‎ मंगेश रंगरावजी खवले (४१) हे‎ चांदूर रेल्वे नगर परिषदेत‎ मुख्याधिकारी होते.

२२ जुलै २०१५‎ रोजी मंगेश खवले हे आपल्या‎ कक्षात उपस्थित असताना,‎ नगरसेवक बंडू आठवले व‎ त्याच्यासोबत बच्चू वानरे तसेच‎ श्रीनिवास सूर्यवंशी, सुनील‎ अग्रवाल हे कक्षात दाखल झाले.‎ आठवले यांनी तत्पूर्वी सर्वसाधारण‎ सभेत आत्मदहन करणार‎ असल्याचे लेखी निवेदन‎ मुख्याधिकारी यांना दिले. त्यानंतर‎ बंडू आठवलेने मुख्याधिकारी‎ यांच्या कक्षातील खुर्च्यांची‎ फेकाफेक करून शासकीय कामात‎ अडथळा निर्माण केला. त्यांना‎ शिविगाळ करून जीवे मारण्याची‎ धमकी दिली.

अशा तक्रारीवरून‎ चांदूर रेल्वे पोलिसांनी बंडू‎ आठवलेविरुद्ध गुन्हा नोंदवला. या‎ गुन्ह्याचा तपास पूर्ण करून‎ पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र‎ दाखल केले. सदर प्रकरणात‎ अतिरिक्त सरकारी वकील पंकज‎ रामेश्वर इंगळे यांनी सहा साक्षीदार‎ तपासले. दोन्ही पक्षाच्या‎ युक्तिवादानंतर जिल्हा व सत्र‎ न्यायाधीश एस. बी. जोशी यांच्या‎ न्यायालयाने बंडू आठवलेला दोन‎ वर्षांचा सश्रम कारावास, दोन‎ हजार रुपये दंड सुनावला आहे.‎

बातम्या आणखी आहेत...