आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खून:अमरावतीत प्रेयसीसमोरच जुन्या प्रियकराचा नव्याने घेतला जीव

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सचिन विजयराव खरात (३१ रा. नवसारी, अमरावती) असे मृताचे तर राजेश पंडितराव गणोरकर (३३ रा. सोनोरी, चांदूर बाजार) असे आरोपीचे नाव आहे. शहरातील ३२ वर्षीय विवाहित महिलेसोबत सचिनचे प्रेमसंबंध होते. मात्र, काही महिन्यांपूर्वी सचिनसोबत तिचे ‘ब्रेकअप’ झाले. त्यानंतर या महिलेची राजेशसोबत ओळख झाली व त्यांच्यात प्रेम जुळले. राजेशला तिच्या पहिल्या प्रियकराची माहित होते राजेशचा वाढदिवस असल्यामुळे रविवारी सकाळी त्याने या महिलेला फोन केले. मात्र, तिने राजेशचे फोन स्वीकारले नाहीत. त्यावेळी राजेशने सचिनला फोन करून चांगापूर फाट्यावर बोलावले. सचिन चांगापूर फाट्यावर गेला, राजेशने सचिनला महिलेला कॉल करायला सांगितले व चांगापूर फाट्यावर बोलावले. महिला काही वेळातच चांगापूर फाट्यावर पोहचली. त्यानंतर सचिन व राजेश यांच्यात बाचाबाची झाली. हा वाद वाढला आणि राजेशने चाकू काढला व सचिनवर वार केले. यात सचिन जाग्यावरच ठार झाला. घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. याप्रकरणी तपास सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...