आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती जिल्ह्यात अतिवृष्टीचा फटका:नव्या निकषांनुसार 329 कोटींची नुकसान भरपाई 533 कोटींवर पोहचली

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शासनाने नैसर्गिक आपत्तीपोटी द्यावयाच्या नुकसान भरपाईची रक्कम दुप्पट करुन दोन हेक्टरची मर्यादा तीन हेक्टर केल्यामुळे जिल्ह्यातील शेतजमीन व शेतीपिकांच्या नुकसानीचा आकडा तब्बल 329 कोटींनी वाढला आहे. पू्र्वी जिल्ह्यात 204 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाला सादर केला होता. आता तो 533 कोटी 14 लाख 65 हजार 314 रुपयांवर पोचला असून नवा अहवालही विभागीय आयुक्तांमार्फत राज्याच्या मदत व पुनर्वसन मंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे.

अतिवृष्टी व संततधार पाऊस तसेच पूरस्थितीमुळे होणाऱ्या शेतिपिकांच्या व शेतजमीनीच्या नुकसानासाठी सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना मदत करते. ही मदत 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना देय असते. त्यासाठी नॅशनल डिझास्टर रिलीफ फंड (एनडीआरएफ) या राष्ट्रीय संस्थेने ठरविलेले निकष पाळले जातात. आतापर्यंत या संस्थेने देय मदत ही दोन हेक्टरच्या मर्यादेत व प्रतिहेक्टरी 6,800 (जिरायती पिके), 13,600 (बागायती पिके) व 18 हजार (फळपिके) अशी निश्चित केली होती. परंतु दरम्यानच्या काळात शिंदे-फडणवीस सरकारने ती वाढवून थेट दुप्पट केली. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला पुन्हा सर्वेक्षण करुन नव्याने अहवाल तयार करावा लागला.

या अहवालानुसार जिल्ह्यात 2 लाख 56 हजार 955 हेक्टर जिरायती शेतजमीनीला फटका बसला असून त्यासाठी 2 लाख 40 हजार 980 शेतकऱ्यांना 349 कोटी 45 लाख 93 हजार 304 रुपयांची नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे. तर 2 हजार 62 बागायती शेतकऱ्यांना 1 हजार 252 हेक्टर शेतजमीनीसाठी 3 कोटी 38 लाख 17 हजार 770 आणि फळपिकांची शेती करणाऱ्या 48 हजार 877 शेतकऱ्यांना 180 कोटी 30 लाख 54 हजार 240 रुपयांची नुकसान भरपाई द्यावी लागेल. जिल्हाभरात 50 हजार 84 हेक्टर जमीनीतील फळपिके अतिवृष्टी व संततधार पावसामुळे खराब झाली. अशाप्रकारे तिन्ही प्रकारच्या पिकांसाठीची 3 लाख 8 हजार 292 हेक्टर शेतजमीन बाधित झाली असून त्यापोटी 533 कोटी 14 लाख 65 हजार 314 रुपयांचे वितरण करावे लागणार आहे. त्यासाठीच्या पात्र शेतकऱ्यांची संख्या 2 लाख 91 हजार 919 आहे.

असे नुकसान, अशी मदत

शेतीचा प्रकार शेतकरी संख्या बाधित क्षेत्र आवश्यक मदत

जिरायती शेती 2,40,980 2,5955.39 349,45,93,304

बागायती शेती 2,062 1 252.51 3 38,17,770

फळबागा 48,877 50, 084.84 180 30,54,240

एकूण 2,91,919 3 08,292.74 533,14,65,314

बातम्या आणखी आहेत...