आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावतीमध्ये पोलिसांची कारवाई:दारुबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात जाणारी 4.72 लाखाची विदेशी दारू जप्त

अमरावतीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

वर्धा जिल्ह्यात दारूबंदी असली तरी सीमेवर असलेल्या तिवसा येथून अनेक मार्ग व वेगवेगळ्या साधनांद्वारे नेहमीच देशी-विदेशी दारूची वाहतूक केल्या जाते. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू असल्याने तिवसा पोलिसांच्या चमूने इनोव्हा कारसह वर्धेत जाणारा 4 लाख 72 हजार रुपयांचा अवैध दारूसाठा जप्त केला. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहे.

जसवंतसिंग लहरीसिंग अंधेरेले बावरी व लहरिसिंग मखमलसिंग अंधेरेले बावरी अशी अवैध दारू वाहतूक प्रकरणी गुन्हे दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. हे दोघेही तळेगांव श्यामजीपंत येथील असून त्यांना पोलिसांनी तिवसा नजीकच्या वणी फाट्यावर अटक केली. पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत सातव, उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांचे नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.

अवैधरित्या विदेशी दारूची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती तिवसा पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे त्यांनी वणी फाट्यावर सापळा रचून इनोव्हा कारची तपासणी केली असता त्यात ऑफिसर चॉईस २ पेटी, इम्पेरियल ब्ल्यू 2 पेटी, स्टेअरिंग, रिझर्व्ह (बी-७) एक पेटी, हेवर्ड 5000 बिअर बॉटल व कॅन प्रत्येकी तीन पेट्या असा एकूण 72 हजार रुपयांचा विदेशी दारूसाठा व 4 लाख रुपये किमतीची कार असा एकूण 4 लाख 72 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

यातील आरोपी जसवंतसिंग बावरी व लहरिसिंग बावरी या दोघांवर गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली. सदर कारवाई पोलिस उपनिरीक्षक शैलेश म्हस्के, नायक पोलिस शिपाई रोहित मिश्रा, जमादार गजभिये, शिपाई भूषण यांनी केली. पुढील तपास तिवसा पोलीस करीत आहे.