आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादूषित गटारांमध्ये (मॅन्युअल स्कॅव्हेंजर) काम करताना मृत्यू ओढवल्यास त्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी सामाजिक न्याय विभागाने सन २०१९ मध्ये शासन निर्णय जारी केला. अशा कामात मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश आहेत. याबाबत जनजागृती करण्यासाठी समाजकल्याण विभागाने एका कार्यशाळेचे आयोजन केले होते.
कार्यशाळेला उपस्थित असणाऱ्यांनी आपापल्या गावातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लक्षात हा मुद्दा आणून द्यावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. सामाजिक न्याय विभागामार्फत सफाई कर्मचारी व त्यांचे पुनर्वसन अधिनियमाबाबत प्रबोधनपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या विभागाचे प्रादेशिक उपायुक्त सुनील वारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यशाळेत ही माहिती देण्यात आली.
सहायक सरकारी वकील अॅड. भोला चव्हाण, गणेश तांबोले, अशोक सारवान, विशाल शुक्ला, सहायक समाजकल्याण आयुक्त माया केदार, राजेंद्र भेलाऊ आदी यावेळी उपस्थित होते. सहायक आयुक्त माया केदार यांनीही मार्गदर्शन केले. विशाल शुक्ला यांनी कायद्याबाबत मार्गदर्शन केले. योजनांचा लाभ सर्वदूर पोहोचणेस यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन अॅड. भोला चव्हाण यांनी केले. दरम्यान समाजकल्याण खात्याच्या सर्व योजनांबाबत सफाई कामगारांच्या वस्तीत जाऊन माहिती दिली जाईल, असे राजेंद्र भेलाऊ यांनी सांगितले. समाजकल्याण निरीक्षक एस. आर. कोंडे यांनी प्रास्ताविक केले. बार्टीचे प्रकल्प अधिकारी विजय वानखेडे यांनी संचालन केले. कार्यालय अधीक्षक शालिनी प्रभे यांनी आभार मानले.
कार्यशाळेत भूमिका मांडताना अॅड. भोला चव्हाण. मंचावर इतर मान्यवर अधिकारी व पदाधिकारी. हाताने मैला उचलण्याच्या अमानवीय प्रथेचे उच्चाटनदरम्यान, हाताने मैला उचलण्याच्या अमानवीय प्रथेचे समूळ उच्चाटन करण्यासाठी केंद्र शासनाने २०१३ साली कायदा पारित केला असून, सफाई कामगारांवर होणारा अन्याय रोखणे, त्यांचे प्रतिष्ठापूर्वक पुनर्वसन करणे हा त्या कायद्याचा उद्देश आहे. या कायद्याची सर्वदूर जागृती व्हावी, असे प्रतिपादन समाजकल्याण उपायुक्त सुनील वारे यांनी केले. ते म्हणाले की, या अनिष्ट प्रथेचे उच्चाटन करण्यासाठी केंद्र शासनाने अधिनियम २०१३ पारित केला व तो कायदा ६ डिसेंबर २०१३ पासून लागू झाला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.