आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणपती:चांदूर तालुक्यात 27 गावांत एक गाव-एक गणपती

चांदूरबाजारएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनामुळे गेली दोन वर्षे सार्वजनिक गणेशोत्सवाला बंदी होती. परंतु यावर्षी कोठेलेही निर्बंध नसल्यामुळे तालुक्यात सुमारे अडीचशे ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जात असून, २७ गावांमध्ये ‘एक गाव-एक गणपती’ उपक्रम राबवण्यात आला आहे. दरम्यान, मूर्तीच्या किंमतीत पाचपट वाढ झाली असली तरी भक्तांचा उत्साह कायम आहे.

सध्या घरगुती गणेशमूर्ती २५० रूपयापासून, तर एक हजार रुपयांपर्यंत विक्रीस उपलब्ध आहे. कोरोनाआधी याच मूर्ती ५० ते २५० रुपयांपर्यंत उपलब्ध होत्या. मूर्तींची किंमत सरासरी पाच पट वाढल्याने यावर्षी बाजारात फक्त ४१ दुकानेच आहेत. कोरोना अगोदर हीच संख्या ७२ इतकी होती. पोलिस विभागाकडे झालेल्या नोंदीनुसार, तालुक्यातील चांदूर बाजार पोलिस स्टेशन अंतर्गत एकूण ७३ सार्वजनिक बाप्पा विराजमान होणार आहेत. पैकी चांदूर बाजार शहरात १८ तर ग्रामीण भागात ५५ बाप्पांची सार्वजनिकरीत्या स्थापना होणार आहे.

राजुरा, चिंचोली काळें, वाठोंडा, बेसखेडा, जालनापूर, थुगांव, माधान, काजळी, नानोरी, पिंपळखुटा, दिलालपूर, पिली, जसापूर, सर्फाबाद १४ गावांत ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना साकारण्यात आली आहे. याशिवाय तालुक्यातील शिरजगाव कसबा पोलिस स्टेशन अंतर्गत एकूण ५८ सार्वजनिक बाप्पा विराजमान होणार आहे. यात दोन गांवात एक गाव-एक गणपती असणार आहे. या पोलिस स्टेशन अंतर्गत पांढरी व कल्होडी येथे ही संकल्पना प्रत्यक्ष नावारुपाला आली आहे. ब्राम्हण वाडा थडी पोलिस स्टेशन अंतर्गत एकूण ३१ सार्वजनिक बाप्पा विराजमान होणार आहे. त्यापैकी चकूम, सुरळी, वणी, गौरखेडा, कुरणखेड, विश्रोळी, सांगोला या सात गावात एक गाव-एक गणपती आहे.

तर तिकडे आसेगांव पोलिस स्टेशन अंतर्गत एकूण आठ सार्वजनिक बाप्पा विराजमान होणार असून, आसेगावमध्ये चार ठिकाणी सार्वजनिक बाप्पा विराजमान झाले आहेत. तर दहिगांव, लसणापूर, विरुळ पुर्णा, टाकरखेडा पूर्णा या चार गांवात एक गाव एक गणपती आहे. सार्वजनिक गणेत्सवासोबतच तालुक्यात घरोघरी गणरायाचे आगमन झाले आहे. त्यासाठी सर्वच ठिकाणी, जय्यत तयारीही झाली आहे. स्थापनेच्या दिवशी सर्वदूर सनई, चौघड्याच्या निनाद व आरतीच्या आवाजाने वातावरण भक्तीमय, मंगलमय व प्रसन्न झाले होते. कोरोनामुळे दोन वर्षानंतर भक्तांचा ऊत्साह ओसंडून वाहत असला तरी महागाईच्या माराने नागरिक त्रस्त आहेत. सजावटीच्या सामान तर महागलेच परंतू बाप्पाच्या मूर्तींच्या ही किंमतीत भरमसाठ वाढ झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...