आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:दर्यापुरात मनसेचे पालिका मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

दर्यापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

स्थानिक नगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक १० मधील मुख्य रस्त्यालगतच्या कोकाटे कॉम्प्लेक्स ते मेटकर यांच्या घरापर्यंतचा रस्ता ठिकठिकाणी पूर्णतः उखडला असून, काही ठिकाणी खड्डेमय झाला आहे. त्यामुळे रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ते, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

या गंभीर समस्येची दखल घेण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष लकी पाटील गावंडे व उपशहर अध्यक्ष अनिकेत सुपेकर यांनी घेतली असून, त्यांच्या नेतृत्वात नगरपालिका मुख्याधिकारी पराग वानखडे यांना निवेदन देण्यात आले. तत्पूर्वी त्यांच्याशी सविस्तर चर्चाही करण्यात आली. या रस्त्यावरुन शाळकरी विद्यार्थी, व्यवसायिक, व्यापारी व रहिवाशांची ये-जा सुरु असते. मनसेच्या निवेदनाची दखल घेत नगरपालिका प्रशासनाने त्वरित रस्ता बांधावा, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. निवेदनदेतेवेळी मनसेचे उपशहर अध्यक्ष मयूर कडू, संदीप झळके, जनहित कक्षाचे शहर अध्यक्ष राम शिंदे, जनहित कक्षाचे उपशहराध्यक्ष भूषण टेकाळे, दीपक बगाळे व आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...