आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजि. प. अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवड मंगळवारी पार पडली. राष्ट्रवादीने भाजपशी हात मिळवणी करून उपाध्यक्ष पद पदरी पाडून घेत काँग्रेसला एकाकी पाडले. जि. प.च्या ५३ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सर्वाधिक २६ जागा भाजपने जिंकल्या तर काँग्रेस १३, राष्ट्रवादी ८, चाबी संघटना ४ व अपक्ष दोन असे संख्याबळ होते. सत्ता स्थापन करण्यासाठी २७ सदस्यांच्या आकड्याची गरज होती. तेव्हा दोन्ही अपक्ष भाजपचे बंडखोर असल्याने भाजपची सत्ता स्थापन होणार हे निश्चितही झाले होते. मात्र, जिल्ह्यातही महाविकास आघाडी करून काँग्रेस, राष्ट्रवादी, चाबी संघटन व दोन्ही अपक्ष मिळून भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात येईल अशा चर्चा सुरू असताना भाजपने बंडखोर सदस्यांची मनधरणी केली. तर दुसरीकडे ऐनवेळी राष्ट्रवादीकडून भाजपला मैत्रीचा हात देण्यात आला. पाठोपाठ चाबीनेही भाजपला समर्थन दिले. त्यामुळे भाजपची सदस्य संख्या ४० होऊन अध्यक्षपदी भाजपचे पंकज रहांगडाले तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे यशवंत गणवीर यांची निवड करण्यात आली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.