आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:हमालपुरा येथील कॅफेमध्ये प्रेमीयुगुलांचे अश्लील चाळे

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रेमीयुगुलांना चाळे करण्यासाठी तासानुसार पैसे आकारून जागा उपलब्ध करून देणाऱ्या हमालपुरा येथील एका कॅफे हाऊसवर राजापेठ पोलिसांनी आज, बुधवारी सायंकाळी ६ वाजता धाड टाकली. या कारवाईत ३ जोडप्यांसह २ संचालक व दुकानमालकाला ताब्यात घेण्यात आले.हमालपुरा येथे नव्यानेच आरजे नामक कॅफे हाऊस सुरू झाले आहे. या कॅफे हाऊसमध्ये प्रेमीयुगुलांना तासानुसार पैसे आकारून चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती राजापेठ पोलिसांना मिळाली.

या माहितीच्या आधारावर पोलिसांनी बुधवारी सायंकाळी ६ वाजता या कॅफे हाऊसवर धाड टाकली. यावेळी तीन जोडप्यांना चाळे करताना ताब्यात घेण्यात आले. तसेच कॅफे हाऊसचे दोन संचालक दुकान मालकालाही ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी कॅफे हाऊसचे संचालक व दुकान मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई राजापेठचे ठाणेदार मनीष ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आरती गवई, मनीष करपे, अतुल संभे, रवी लिखितकर, दानिश शेख, सागर भजगवरे आदींनी केली.

बातम्या आणखी आहेत...