आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भट्टी उद्ध्वस्त‎:गोरेगाव जवळ खलडोली शेतशिवारात‎ ग्रामस्थांनी केली दारू भट्टी उद्ध्वस्त‎

शेंदुरजनाघाट3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेंदुरजनाघाट तालुक्यातील गोरेगाव लगतच्या‎ खलडोली शेतशिवारामध्ये गावठी दारू तयार‎ करण्यात येणारा अड्डा सरपंच व ग्रामस्थांनी‎ उद्ध्वस्त करत दारूची निर्मिती करणाऱ्या‎ रामकिशन धुर्वे नामक व्यक्तीला पोलिसांच्या‎ स्वाधीन केले. गावामध्ये मोठ्या प्रमाणात‎ व्यसनाधीनता वाढल्यामुळे ग्रामस्थांनी धुर्वे याला‎ वारंवार समज दिल्यानंतर हे पाऊल उचलले.‎

सरपंच सुखेदव उईके, गोकुल घारड, किशोर‎ कुमरे, सुखेदव उईके, महेश धुर्वे, प्रणय भड, राहुल‎ युवनाते, सतिश उईके यांनी दारू अड्डा गाठत धुर्वे‎ याच्यासमोरच दारूभट्टी उद्ध्वस्त केली. त्यानंतर‎ पोलिसांना पाचारण करण्यात आले. बेनोडा‎ (शहीद) पोलिस स्टेशनचे ठाणेदार मिलिंद सरकटे‎ यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळ गाठून साहित्यासह‎ त्याला ताब्यात घेतले. ग्रामस्थांनी घेतलेल्या या‎ पुढाकाराबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.‎

बातम्या आणखी आहेत...