आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लक्षणे सारखीच:‘कोरोना’च्या लाटेत ‘सारी’चाही धुमाकूळ; सारीत रुग्णाचा अहवाल नसतो पॉझिटिव्ह

अमरावती11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 15 जणांचा मृत्यू; 869 नवे कोरोना पॉझिटिव्ह; साधारणत: सारीचेच परिवर्तन होते कोरोनात

कोरोनाच्या लाटेत जिल्ह्यात ‘सारी’चाही धुमाकूळ सुरू असून वर्षभरात या दिर्घकालीन टर्मिनलाॅजीमुळे ३३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सारी अर्थात सिव्हीयर अॅक्युट रेस्पिरेटरी इन्फेक्शन. हा आजार नसून दिर्घकाळ चालणारा फुफ्फुसाचा संसर्ग (इन्फेक्शन) होय. या संसर्गातही रुग्णाला श्वसनास त्रास होतो. मात्र रुग्णाचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह नसतो. ‘सारी’चाच एक भाग कोरोना होय. साधारणत: ‘सारी’चेच परिवर्तन हे कोरोनात होते. त्यामुळे आधीपासून ‘सरी’चे इन्फेक्शन असलेल्या रुग्णांना कोरोनाची बाधा होण्याची दाट शक्यता असते. कोरोना रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह असतो. लक्षणे दोन्हींचीही सारखीच आहेत.

वर्षभरात जिल्ह्यात ‘सरी’चे ४ हजार ३०० च्या वर रुग्ण आढळले. त्यापैकी २ हजार ७५० संशयितांचे कोरोना चाचणीसाठी थ्रोट स्वॅब घेण्यात आले. त्यापैकी ७३० रुग्णांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. आधी सारी असलेल्या व नंतर कोरोना झालेल्या १०४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला. मात्र तरीही ‘सारी’मुळे जिल्ह्यात वर्षभरात ३३० रुग्ण दगावले. सातत्याने जर उपचार सुरू राहिले तर ‘सारी’चा रुग्ण बरा होऊ शकतो. या संसर्गावर उपचाराची जिल्ह्यात सोय आहे. कारण हा गेल्या अनेक वर्षापासून अस्तित्त्वात असलेला संसर्ग होय,अशी माहिती जिल्ह्याच्या आरोग्य विभागाने िदली. सप्टेंबर २०२० मध्ये सर्वाधिक ९६ सारी असलेल्या रुग्णांचा मृत्यू झाला. तर मार्चमध्ये सर्वात कमी २ रुग्णांचा मृत्यू झाला. ऑगस्ट त नाेव्हेंबर या चार महिन्यात मोठया प्रमाणात ‘सरी’चे रुग्ण आढळले.

न्युमोनिया अन् टीबीच्या रुग्णांनाही सारी होऊ शकतो
चाचणी अहवाल आल्यानंतर श्वासोच्छ्वासाचा त्रास कोराेनामुळे झाला तसेच चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला तर त्या रुग्णाला कोविड १९ संसर्ग झाल्याचे समजून त्याच्यावर उपचार केले जातील. मार्च चाचणी अहवाल निगेटिव्ह आला पण, रुग्णाला श्वसनास त्रास होत असेल तर त्याला सारी समजले जाते. ‘सारी’वर उपचार करण्याची सोय आहे. विषाणुजन्य न्युमोनिया, टीबी हे संसर्गजन्य आजार आहेत. अशा रुग्णांनाही सारी होऊ शकतो. मात्र सारी हा आजार संसर्गजन्य नाही.

१५ जणांचा मृत्यू; ८६९ नवे कोरोना पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आज, सोमवारी १५ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत मृत झालेल्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या ९९४ झाली आहे. त्याचवेळी गेल्या २४ तासांत ८६९ नव्या रुग्णांची भर पडली. यामुळे एकूण कोरोनाबाधीतांचा आकडा ६२ हजार ३४ वर पोहोचला आहे. सोमवारच्या मृतांमध्ये ६५ वर्षीय पुरुष धनोडी, वरुड, ८० वर्षीय महिला सामरा नगर, अमरावती, ५९ वर्षीय पुरुष कळमगाव, चांदुर रेल्वे, ६० वर्षीय पुरुष कोळी, बाभूळगाव, ४५ वर्षीय पुरुष दिघोरी, नागपूर, ४० वर्षीय पुरुष धारणी, ३१ वर्षीय महिला अंबिका नगर, अमरावती, ५६ वर्षीय महिला धामणगाव रेल्वे, ४० वर्षीय महिला नांदगाव खंडेश्वर, ६० वर्षीय पुरुष राजना, चांदूर रेल्वे, ५२ वर्षीय महिला नागपूर, ६८ वर्षीय पुरुष श्रीकृष्ण नगर, नागपूर, ५४ वर्षीय पुरुष हिलटॉप कॉलनी, नागपूर, ९० वर्षीय पुरुष आर्वी, वर्धा व ७७ वर्षीय महिला यवतमाळ यांचा समावेश आहे. यापैकी १० रुग्णांची प्राणज्योत येथील जिल्हा कोवीड रुग्णालयात मालवली. तर प्रत्येकी एका रुग्णाने उपजिल्हा रुग्णालय अचलपूर, दुर्वांकुर रुग्णालय अमरावती,

बातम्या आणखी आहेत...