आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक दिवस आधीच ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन:साहित्य संमेलनाचा नवा पायंडा, वर्ध्यात 290  स्टॉलद्वारे पुस्तक विक्री

महात्मा गांधी साहित्यनगरी, वर्धा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

साहित्य संमेलनांमध्ये होणारी पुस्तक विक्री आणि वाचकांची मागणी पाहता तसेच शेवटच्या दिवशी पुस्तक खरेदीला मोठ्या प्रमाणात गर्दी होते आणि वेळेअभावी अनेक वाचकांना हवी ती पुस्तके खरेदी करता येत नाहीत त्यावर उपाय म्हणून साहित्य संमेलनाच्या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन संमेलनाच्या पूर्वसंध्येलाच करून ‘संमेलनात चार दिवसांचे ग्रंथ प्रदर्शन’ असा नवीन पायंडा वर्धा येथील ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातून सुरू करण्यात आला.

साहित्य संमेलन वर्धा येथील स्वावलंबी शिक्षण मंडळाच्या पटांगणात ३ ते ५ फेब्रुवारीदरम्यान होत आहे. कोट्यावधी रुपयांची पुस्तकांची विक्री एका साहित्य संमेलनातून होत असते. दोन वर्षांपूर्वी यवतमाळला झालेल्या साहित्य संमेलनात पाचं ते सात कोटी रुपयांपर्यंत पुस्तकांची विक्री झाली होती तर नाशिक येथेही नऊ ते दहा कोटी रुपयांपर्यंत पुस्तकांच्या विक्रीचा आकडा गेला होता.

बातम्या आणखी आहेत...