आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनुष्यबळ नियुक्ती:हेल्थ अँड वेलनेस सेंटरचे उद्घाटन मनुष्यबळ नियुक्तीअभावी रखडले

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मनपा क्षेत्रात १२ विविध ठिकाणी हेल्थ अँड वेलनेस सेंटर (आयुष्यमान भारत, आरोग्यवर्धिनी केंद्र) १५ डिसेंबरपासून सुरू होणार होते. परंतु, जि. प.ने मनुष्यबळाची नियुक्तीच केली नसल्याने अजूनही हे आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू झाले नाहीत. केंद्र शासनाने या हेल्थ अँड वेलनेस सेंटरमध्ये तज्ज्ञ मनुष्यबळाच्या नियुक्तीची जबाबदारी जिल्हा परिषदेकडे सोपवली आहे. मनुष्यबळ भरतीसाठी निविदाही काढल्यात परंतु, अद्याप नियुक्त्याच झाल्या नसल्याने हे आरोग्यवर्धिनी केंद्रच सुरू झाले नाहीत. अन्यथा मनपाद्वारे १२ ही केंद्रांच्या इमारतींसह फर्निचार, औषधांची सोय केली आहे.

जि. प.ने मनुष्यबळाची नियुक्ती केली नाही : हेल्थ अॅण्ड वेलनेस सेंटरमध्ये एक डाॅक्टर, एक स्टाफ नर्स, मल्टिपर्पज वर्कर, आशा सेविका आणि अटेंडंट असे पाच व एकूण ६० कर्मचारी नियुक्त करायचे आहेत. यांच्या नियुक्तीची जबाबदारी ही जि. प.कडे सोपवली. परंतु, त्यांनी नियुक्त्याच केल्या नाहीत, असे मनपाचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. विशाल काळे यांनी सांगितले आहे.

१२ आरोग्यवर्धिनी केंद्र
झोन क्र. १ मध्ये नवसारी गावठाण मनपा शाळा, रहाटगाव दवाखाना, गाडगेनगर परिसरातील राधा नगर प्रगती शाळा, झोन क्र. २ मध्ये अंबिकानगर मनपा शाळा, रुख्मिणीनगर मनपा शाळा क्र. १९, बजरंग प्लाॅट मनपा शाळा क्र. ८, शारदानगर पन्नालाल बगीचा येथील एक सभागृह, झोन क्र. ३ मध्ये शुक्रवार बाजार मनपा दवाखान्यातील एक सभागृह, चपराशीपुरा उर्दू मनपा शाळा क्र. ६, झोन क्र. ४ मध्ये अकोली येथील दवाखान्याची एक खोली, बडनेरा मनपा शाळा क्र. २४ आणि माया नगर येथील मनपा शाळा.

बातम्या आणखी आहेत...