आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठ सिनेटच्या मतमोजणीला प्रारंभ:8 गटांमध्ये 59 कर्मचाऱ्यांचा समावेश; 40 पेक्षा अधिक महिला कर्मचाऱ्यांवर मतमोजणीची जबाबदारी

अमरावती13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
मतमोजणीत व्यग्र झालेले अधिकारी - कर्मचारी. - Divya Marathi
मतमोजणीत व्यग्र झालेले अधिकारी - कर्मचारी.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अधीसभा (सिनेट), विद्वत परिषद (अ‍ॅकडेमीक कौन्सील) व अभ्यास मंडळांच्या (बीओएस) निवडणुकीची मतमोजणी आज, मंगळवारी सकाळी 8.00 वाजता सुरू झाली.

विद्यापीठाचा वनस्पतीशास्त्र विभाग व ज्ञानस्रोत केंद्राची अभ्यासिका येथे तशी व्यवस्था करण्यात आली आहे. 40 पेक्षा अधिक महिला कर्मचाऱ्यांवर मतमोजणीची जवाबदारी देण्यात आली असून आठ गटांमध्ये 59 कर्मचारी मतमोजणीसाठी कार्यरत आहेत.

वनस्पतीशास्त्र विभागातील सहा आणि अभ्यासिकेतील दोन अशा ८ टेबलांवर मतमोजणीचे कार्य सुरु आहे. मतमोजणीची प्रक्रिया सकाळी 8.00 वाजता सुरू झाली असली तरी सर्व मतपत्रिकांची पडताळणी, त्यातील वैध-अवैध मतपत्रिकांचे विलगीकरण, मतपत्रिकांचे गठ्ठे तयार करणे, विजयी होण्यासाठीचा ‘कोटा’ ठरवणे आदी प्रक्रियांमुळे प्रत्यक्ष मतमोजणी सुरू होण्याला दुपार उजाडली आहे.

प्रत्यक्ष आढावा घेतला असता सर्व 63 मतदान केंद्रावरील सिलबंद मतपेट्या रविवारी मध्यरात्रीनंतर विद्यापीठामध्ये पोहोचल्या. आज सकाळी 8.00 वाजता त्या मतपेट्या उघडण्यात आल्या असून त्यातील मतपत्रिकांचा हिशेब जुळविण्याचे काम हाती घेण्यात आले. यासाठी स्वतंत्र चार गटांची नेमणूक करण्यात आली आहे.

उपकुलसचिव डॉ. सुलभा पाटील, मीनल मालधुरे, सहायक कुलसचिव साक्षी ठाकूर व स्मीता साठे या गटप्रमुखांच्या नियंत्रणामध्ये 40 महिला कर्मचारी कार्यरत आहेत. याशिवाय मतमोजणीसाठी आठ गटांची निर्मिती करण्यात आली आहे. गट क्रमांक एकमध्ये गणक म्हणून दीपक वानखडे, तर लेखनिक म्हणून एम.एस. तायडे, गट क्रमांक 2 मध्ये गणक म्हणून शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. अविनाश असनारे, तर लेखनिक म्हणून मोहन डाबरे, गट क्रमांक 3 मध्ये गणक म्हणून अभियंता शशीकांत रोडे, तर लेखनिक म्हणून जे.डी. भडके, गट क्रमांक 4 मध्ये गणक म्हणून आर.एम. नरवाडे, तर लेखनिक म्हणून वाय.बी. कांत, गट क्रमांक 5 मध्ये गणक म्हणून विक्रांत मालवीय, तर लेखनिक म्हणून नरेंद्र घाटोळ, गट क्रमांक 6 मध्ये गणक म्हणून विरेंद्र निमजे, तर लेखनिक म्हणून पी.आर. गुल्हाने, गट क्रमांक 7 मध्ये गणक म्हणून डॉ. दादाराव चव्हाण, तर लेखनिक म्हणून एस.डी. ठाकरे, गट क्रमांक 8 मध्ये गणक म्हणून ऋतुराज दशमुखे, तर लेखनिक म्हणून राजेश उपाध्ये यांचा समावेश आहे,

अशाप्रकारे आठ गटांमध्ये 59 कर्मचारी मतमोजणीसाठी कार्यरत आहेत. तर निवडणूक निर्णय अधिकारी तथा कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांच्या मार्गदर्शनात उपकुलसचिव मंगेश वरखेडे, सहायक कुलसचिव रवींद्र सयाम, प्रभारी अधीक्षक उमेश लांडगे व अधिनस्त कर्मचारी हे कार्यालयीन व्यवस्थेत व्यग्र आहेत. सिनेटच्या 36, विद्वत परिषदेच्या 6 आणि एक अभ्यास मंडळ अशा 43 मतदारसंघांसाठी ही निवडणूक पार पडली.

बातम्या आणखी आहेत...