आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विज्ञान प्रदर्शन:तालुका विज्ञान प्रदर्शनात 66 प्रतिकृतींचा समावेश

दर्यापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुका विज्ञान मंडळ, दर्यापूर शैक्षणिक विचार मंच, पंचायत समिती यांच्या संयुक्त सहकार्याने एक दिवसीय विज्ञान प्रदर्शनी एकविरा स्कूल ऑफ ब्रिलीयंट्समध्ये नुकतीच पार पडली. यावेळी शहर व तालुक्यातील विविध शाळांनी सहभाग घेत एकूण ६६ प्रतिकृतींचे प्रदर्शन भरवण्यात आले होते.

या वेळी विशेष उपस्थितीमध्ये गटशिक्षणाधिकारी विरेंद्र तराळ, एकवीरा स्किलच्या सचिव पूनम पनपालिया, केशव भडांगे, परीक्षक म्हणून अंजनगाव येथील सारडा महाविद्यालयाचे प्रा. मंगेश डगवाल, चंद्रशेखर गुलवाडे उपस्थित होते. विरेंद्र तराळ, सुनील स्वर्गीय, देवी घुरडे आदींनी विज्ञान प्रदर्शनीला भेट देत शुभेच्छा दिल्यात. या प्रसंगी मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.

दरम्यान, परीक्षकांच्या निकालांती प्राथमिक गटात आदर्श हायस्कूलचा विद्यार्थी दिव्य देवके याच्या प्रतिकृतीला प्रथम, तर स्वयंचलित पथदिवे व हायड्रॉलिक ट्रॅफिक कंट्रोल या प्रतिकृतीला अनुक्रमे द्वितीय व तृतीय पुरस्कार मिळाला. माध्यमिक गटात एकवीरा स्कूल ऑफ बिलियंट्सच्या रोबो प्रतिकृतीला प्रथम क्रमांक प्राप्त झाला. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात विज्ञान प्रदर्शनी पार पडली. प्रदर्शनीला दर्यापूर तालुका विज्ञान अध्यापक मंडळ तसेच विज्ञानप्रेमींनी उपस्थित राहून प्रतिसाद दिला. प्राचार्या उज्वला गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. प्रदर्शनीच्या यशस्वी आयोजनासाठी शालेय घटकांनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...