आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) येथे शवविच्छेदनासाठी सोबत येणाऱ्या मृतांच्या नातेवाइकांची विश्रामगृहाची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून हे विश्रामगृह बंद असल्याने येथे येणाऱ्या मृतांच्या नातेवाइकांना बाहेर रस्त्यावर उभे राहावे लागत असल्याचा आरोप भीम ब्रिगेडने केला असून, तत्काळ शवविच्छेदनगृहाच्या बाजूला असलेले विश्रामगृह सुरू करण्यात यावे, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा जिल्हा शल्य चिकित्सकांना निवेदनातून देण्यात आला.
भीम ब्रिगेडच्या निवेदनानुसार, जिल्हा सामान्य रुग्णालय येथे जिल्ह्यासह इतरही ठिकाणावरून रुग्ण उपचारा करता येतात. त्यांच्यासोबत नातेवाईकही राहतात. मात्र, रुग्णालयात पुरेशी सुविधा उपलब्ध होत नसल्याने रुग्णांसह नातेवाईकांना त्रास सहन करावा लागतो. त्याच सोबत येथील शवविच्छेदन गृहात मृतकांवर वैद्यकीय तपासणी करण्यात येते. त्याठिकाणी शवविच्छेदन झाल्यानंतर मृतांचे नातेवाइक मृतदेह नेण्यासाठी येतो.
यावेळी त्यांना तासन तास रस्त्यावर उभे राहावे लागत असल्याचे चित्र दररोज दिसून येते. येथे येणाऱ्या नातेवाइकांची स्वतंत्र बसण्यासाठी विश्राम गृहाची व्यवस्था आहे. मात्र, ते विश्रामगृह अजूनही बंद आहे. तर दुसरीकडे याच परिसरात पूल भंडार व्यावसायिकांनी अतिक्रमण केले असल्याचे भीम ब्रिगेड चे म्हणणे आहे. त्यामुळे बंद असलेले विश्रामगृह तत्काळ खुले करून देण्यात यावे, अन्यथा भीम ब्रिगेड तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
यावेळी अध्यक्ष राजेश वानखडे, विक्रम तसरे, नितीन काळे, प्रवीण मोहोड, उमेश कांबळे, अविनाश जाधव, अंकुश आठवले, आदर्श शिंपी, रुपेश तायडे, सुशील चोर पगार आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.