आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालोकसंख्येच्या प्रमाणात शहरी आरोग्य केंद्रांची संख्या वाढवावी, नैसर्गिक आपत्तीच्या निवारणार्थ मनपा हद्दीत यंत्रणा सज्ज ठेवण्यात यावी, पावसाळ्यापूर्वी नाले साफ सफाई करावी, नवाथे आयसोलेशन दवाखाना येथील एक्सरे मशिन त्वरित सुरू करून मनपा दवाखान्यात औषधीचा साठा ठेवावा असे निर्देश शुक्रवारी मनपाच्या विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात झालेल्या आरोग्य व स्वच्छता विभागाच्या आढावा बैठकीत आमदार सुलभा खोडके यांनी दिले. या बैठकीला मनपा आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके, अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, उपायुक्त सुरेश पाटील, उपायुक्त डॉ.सीमा नैताम, मनपा अधिकारी, कार्यकर्ते व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
शहरातील साफ सफाई व कचरा उचलण्याबाबत तसेच आरोग्य विभागाशी संबंधित कामाबाबत नागरिकांच्या समस्यावर चर्चा करून संबंधितांना निर्देश दिले. साफ सफाई हा मनपाचा महत्वाचा विषय असून, या विषयी प्रशासनाने गंभीर दखल घेणे आवश्यक आहे. अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष दररोज फिल्डवर जाऊन साफ सफाईची झाल्याची तपासणी करणे अपेक्षित आहे. स्वच्छता विभागाने आपले काम व्यवस्थित करावे. नागरिकांच्या तक्रारींना प्राधान्याने सोडवावे. काम होणे महत्वाचे आहे. शहरातील संपुर्ण कचरा निर्मूलन व संकलन व्यवस्थित व्हायला हवे. साफ सफाईच्या कामात सुधारणा झालीच पाहिजे. शहरातील अनेक भागातून या संदर्भात तक्रारी येत आहे त्याचा त्वरित निपटारा करावा.ज्या प्रभागात सफाई बाबत तक्रारी आल्यास संबंधीत कंत्राटदार यांना दंड करावा, असे निर्देश आ. खोडके यांनी दिले. प्रत्येक प्रभागातील स्वच्छता कर्मचारी कामावर उपस्थित असणे अनिवार्य आहे. सहाय्यक आयुक्तांनी व वैद्यकीय अधिकारी स्वच्छता, यांनी शहरातील प्रत्येक भागात भेटी देवून तिथल्या साफ सफाईची पाहणी करावी. “स्वच्छ अमरावती, सुंदर अमरावती”, ही संकल्पना राबवण्यासाठी सर्वांनी आपली जबाबदारी पार पाडावी. शहरातील नाल्या त्वरित साफ करण्याची सूचनाही केली. नैसर्गिक आपत्तीच्या निवारणार्थ मनपा हद्दीमध्ये यंत्रणा सज्ज असणे आवश्यक आहे. घनकचरा व्यवस्थापन झोननिहाय करण्याचे निर्देश दिले.
आयसोलेशन दवाखाना येथे एक्सरे मशिन त्वरित सुरू करा : आयसोलेशन दवाखाना येथे एक्सरे मशिन त्वरित सुरू करुन नागरिकांना त्याचा लाभ द्यावा. मनपाच्या दवाखान्याची तपासणी वैद्यकीय आरोग्य अधिकारी तथा सहाय्यक आयुक्तांनी करून दवाखाने सामान्य जनतेकरिता आरोग्याच्या सोयीयुक्त करण्याचे प्रयत्न करावेत. एनयुएचएम अंतर्गत शहर कार्यक्रम व्यवस्थापक वेगळा असावा, अशी सूचनाही आ. खोडके यांनी दिल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.